मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट; राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी

कन्या न्यूज नेटवर्क ||

दावोस  : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उदघाटनानंतर  महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२, २३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार ३ लाख कोटींचा असून, हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला आहे.  तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल ‘जेएसडब्ल्यू’चे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी उपस्थित होते.

पहिला दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना जिंदाल म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान,  दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक ५२०० कोटी रुपयांची असून ४००० रोजगार निर्मिती होणार आहे.   सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था : यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील ५००० युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…

*आतापर्यंत झालेले सामंजस्य करार : एकूण : ४,९९,३२१ कोटींचे*

  • 1) कल्याणी समूह
  • क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
  • गुंतवणूक : ५२०० कोटी
  • रोजगार : ४०००
  • कोणत्या भागात : गडचिरोली
  • 2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
  • क्षेत्र : संरक्षण
  • गुंतवणूक : १६,५०० कोटी
  • रोजगार : २४५०
  • कोणत्या भागात : रत्नागिरी
  • 3) बालासोर अलॉय लि.
  • क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
  • गुंतवणूक : १७.००० कोटी
  • रोजगार : ३२००
  • 4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
  • क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
  • गुंतवणूक : १२००० कोटी
  • रोजगार : ३५००
  • कोणत्या भागात : पालघर
  • 5) एबी इनबेव
  • क्षेत्र : अन्न आणि पेये
  • गुंतवणूक : ७५० कोटी
  • रोजगार : ३५
  • कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
  • 6) जेएसडब्ल्यू समूह
  • क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
  • गुंतवणूक : ३,००,००० कोटी
  • रोजगार : १,०००
  • कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली
  • 7) वारी एनर्जी
  • क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
  • गुंतवणूक : ३०.००० कोटी
  • रोजगार : ७५००
  • कोणत्या भागात : नागपूर
  • 8) टेम्बो
  • क्षेत्र : संरक्षण
  • गुंतवणूक : १००० कोटी
  • रोजगार : ३००
  • कोणत्या भागात : रायगड
  • 9) एल माँट
  • क्षेत्र : पायाभूत सुविधा
  • गुंतवणूक : २००० कोटी
  • रोजगार : ५०००
  • कोणत्या भागात : पुणे
  • 10) ब्लॅकस्टोन
  • क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
  • गुंतवणूक : २५००० कोटी
  • रोजगार : १०००
  • कोणत्या भागात : एमएमआर
  • 11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
  • क्षेत्र : डेटा सेंटर्स
  • गुंतवणूक : २५,००० कोटी
  • रोजगार : ५००
  • कोणत्या भागात : एमएमआर
  • 12) अवनी पॉवर बॅटरिज
  • क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
  • गुंतवणूक : १०.५२१ कोटी
  • रोजगार : ५०००
  • कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
  • 13) जेन्सोल
  • क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
  • गुंतवणूक : ४००० कोटी
  • रोजगार : ५००
  • कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर
  • 14) बिसलरी इंटरनॅशनल
  • क्षेत्र : अन्न आणि पेये
  • गुंतवणूक : २५० कोटी
  • रोजगार : ६००
  • कोणत्या भागात : एमएमआर
  • 15) एच टू ई पॉवर
  • क्षेत्र : हरित ऊर्जा
  • गुंतवणूक : १०.७५० कोटी
  • रोजगार : १८५०
  • कोणत्या भागात : पुणे
  • 16) झेड आर टू समूह
  • क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
  • गुंतवणूक : १७,५०० कोटी
  • रोजगार : २३,०००
  • 17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
  • क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
  • गुंतवणूक : ३५०० कोटी
  • रोजगार : ४०००
  • कोणत्या भागात : पुणे
  • 18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
  • क्षेत्र : हरित ऊर्जा
  • गुंतवणूक : ८००० कोटी
  • रोजगार : २०००
  • 19) बुक माय शो
  • क्षेत्र : करमणूक
  • गुंतवणूक : १७०० कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact