शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रवेश सुरु : मान्यता मिळवणारे सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय 

By Kanya News||

सोलापूर : बोरामणी येथील कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज महाविद्यालय येथे बॅचलर इन कॉम्पुटर अँप्लिकेशन (बीसीए) या अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) मान्यता मिळालेली आहे. या अभ्यासक्रमासाठी एआयसीटीई, नवी दिल्लीकडून मान्यता मिळविणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे.

बीसीए डिग्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरची माहिती व त्याबद्दल उत्सुकता निर्माण होऊन व्यावसायिक करिअर बनवण्यासाठी मदत होते. तार्किक प्रोग्रामिंग भाषा, संगणकीय क्षमता यांचा विकास करून उच्च गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रणालीमुळे कॉम्प्युटर शिक्षणाचा दर्जा वाढतो. कॉम्प्युटर क्षेत्रातील नवनवीन संधी आणि संशोधन विद्यार्थ्यांना करता येते. सध्याच्या जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील व उत्तम व्यावसायिक निर्माण करण्याच्या अनुषंगाने बीसीए या अभ्यासक्रमाचे धडे ग्लोबल व्हिलेजमध्ये मिळावेत या उद्देशाने याची मुहूर्तमेढ रोवत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी  सुवर्णसंधीचा लाभ घेऊन भविष्य घडवावे : सचिवा संगिता शहा 

  •  सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंटरनेटचा प्रचार आणि प्रसारामुळे विद्यार्थी स्वतःच्या अंगी असणाऱ्या कलागुणांच्या माध्यमातून स्वतःचे करिअर बनवू शकतात. बीसीए कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मल्टी लँग्वेज सी प्लस प्लस, जावा, पायथॉन, कॉम्प्युटर एप्लीकेशन डेव्हलपिंग डेटाबेस, स्टॅटर्जी प्रोजेक्ट मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रांमध्ये सुवर्णसंधी निर्माण झाली आहे त्याचबरोबर या सगळ्यांचा हॉस्पिटल, रिसर्च, शैक्षणिक संस्था यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याने बीसीए पदवी असणाऱ्या उमेदवारांना सध्या देशात आणि परदेशात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपले भविष्य घडवावे, अशी अपेक्षा संस्थेच्या सचिवा संगिता शहा यांनी व्यक्त केली आहे.

बीसीए पूर्ण केल्यानंतर सिस्टम इंजिनिअर, कॉम्प्युटर प्रोग्रामर, नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशन, वेब डेव्हलपर, वेब डिझायनर अशा विविध जॉब प्रोफाइलवर मुलाखतीच्या माध्यमातून असेंचर, विप्रो, एच. सी. एल., डेल, कॉग्निझंट, टीसीएस, सिन्टेल, टेक महिंद्रा सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये  विद्यार्थ्यांची निवड करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून साधारणतः २ लाख ते १० लाख पॅकेज मिळविण्याचे प्रयत्न महाविद्यालयाकडून केले जाणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. यशवंत डोके यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact