भारतीय जैन संघटनेच्यावतीने क्रांतीदिनी क्रांतिकारकांना अभिवादन
by kanya news||
सोलापूर : भारतीय जैन संघटनेच्यावतीने दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीस्तंभास पुष्पचक्र वाहून क्रांतीकारांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य श्याम पाटील, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभुते,जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे, आस्था रोटी बँकेचे विजयकुमार छंचुरे, भारतीय जैन संघटनेचे विभागीय सदस्य वालचंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत बशेट्टी, विनोद करपेकर, गणेश आदींची उपस्थिती होती. यावेळी श्याम पाटील आणि अभिनंदन विभूते यांनी मनोगत व्यक्त केले.