“पंचमहाभूतांचा रुद्रावतार” भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण: श्रीनिअंबा नृत्यालयाचा उपक्रम
By Kanya News||
सोलापूर: श्रीनिअंबापरफॉर्मिंग आर्ट्स सोलापूर (श्रीनिअंबा नृत्यालय) यांच्यावतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित शंभरहून अधिक ११० गुणवंत कलाकारांचे भरत- नाट्यम नृत्य आराधना पंचमहाभूतांचा रुद्रावतार या भरतनाट्यम नृत्यातून पंचतत्वाची केलेली मृत्य आराधनाचे आयोजन केले आहे. हा भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी सांयकाळी ७ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे पार पडणार आहे. याचे सादरीकरण श्रीनिवास काटवे, अंबिका काटवे याच्यासह ११० गुणवंत शिष्यवृंद हे करणार आहेत, अशी माहिती श्रीनिवास काटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संगीत सौजन्य योगा कीर्तना (बंगळुरू), संदीप रानडे (मुंबई) यांचे राहणार असून, समर्थ हब्बू, प्रेम काटवे हे सूत्रसंचालन करणार आहेत.
या कार्यक्रमास जागतिक दर्जाचे सुंदरीवादक पंडित भीमण्णा जाधव, श्री सई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. श्रीनिअंबा परफॉर्मिंग आर्ट्स सोलापूर (श्रीनिअंबा नृत्यालय) यांच्यावतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित निसर्गातील पंचमहाभूते पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांच्यावर आधारित भरतनाट्यम-नृत्यनाटिका “पंचमहाभूतांचा रुद्रावतार” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. श्रीनिअंबा नृत्यालय प्रस्तुत ही चौथी नृत्य नाटिका आहे. यामध्ये सात ते ५७ वर्ष वयोगटापर्यंतचे शिष्यवृंद भाग घेत आहेत.
प्रवेश पासेससाठी रसिक प्रेमींनी श्रीनिवास काटवे (७४१००७२८३३) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व निसर्गप्रेमी व कलाप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस राजश्री थलंगे, अंबिका काटवे, नागनाथ लक्का,काशिनाथ भतगुणकी आदी उपस्थित होते.