
महाराष्ट्र राज्यामध्ये आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धा झालीच पाहिजे
राजेंद्र नारायणकर यांची मागणी
By Kanya News
सोलापूर : कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे होणाऱ्या १६ (सोळा) वर्षाखालील किंवा महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या तेरा वर्षाखालील राष्ट्रीय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेपूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम ज्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत, त्या गटाच्या आंतरजिल्हा बास्केटबॉल मुला-मुलींच्या स्पर्धा झाल्याच पाहिजेत. मग ती कोणीही घेवू दे, काही हरकत नाही खेळाडूंचा नुकसान होऊ नये म्हणून राज्यात बास्केटबॉलच्या स्पर्धा झाल्याच पाहिजेत, अशी मागणी बास्केटबाल प्रशिक्षक राजेंद्र नारायणकर यांनी (आयएफ) बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्लीचे अध्यक्ष, सचिवांकडे निवेदनाव्दारे करीत धरणे आंदोलन, चक्री उपोषणाचा इशारा दिला आहे. राजेंद नारायणकर कन्या न्यूजशी बोलताना म्हणाले, यापूर्वी आपण बीएफआयचे अध्यक्ष, सरचिटणीस, बीएफआयचे दिल्लीतील कार्यालय व महाराष्ट्रासाठी डॉ. व्ही रघुत्तम यांच्या समितीला मेल करून राज्यामध्ये आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धा झाल्याच पाहिजेत, अशी विनंती केली होती. राष्ट्रीय स्पर्धेच्या अगोदर ४० दिवसांमध्ये महाराष्ट्रात राज्य स्पर्धा झाल्या पाहिजेत अशीही मागणी मेलद्वारे केली आहे.
राष्ट्रीय स्पर्धा प्रथम १६ (सोळा) व
र्षाखालील किंवा १३ (तेरा) वर्षाखालील घेण्याअगोदर महाराष्ट्र राज्यात आंतरजिल्हा मुलामुलींच्या बास्केटबॉल स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धेच्या अगोदर २५ दिवस अगोदर घेण्यास काहीच हरकत नाही. पण स्पर्धा झाल्या पाहिजेत. अन्यथा राष्ट्रीय स्पर्धा प्रथम कलकत्ता पश्चिम बंगाल किंवा महाराष्ट्रात जिथे प्रथम राष्ट्रीय स्पर्धा होतील तेथे जाऊन पूर्व नियोजित शांतीच्या मार्गाने धरणे आंदोलन किंवा चक्री उपोषण महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करणारे कार्यकर्ते करणारच आहोत, असे निवेदनाद्वारे नारायणकर यांनी कळविले आहे.