अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बास्केटबॉल स्पर्धेस प्रतिसाद

By Kanya News||
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत जिल्हास्तरीय १४ व १७ वर्षाखालील आंतरशालेय मुला-मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा अक्कलकोट रोडवरील पुंजाल क्रीडांगणावरील एसएसआयच्या बास्केटबाल मैदानावर शनिवार, दि. २० आणि रविवार, दि. २१ रोजी पार पडल्या. या स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी बास्केटबॉल प्रशिक्षक एम.शफी, राजेंद्र नारायणकर, बाळासाहेब गायकवाड, ताबीश दौलाताबादकर, अस्लम सगरी, अब्दुल्हा चौधरी,रमीज कारभारी, अहमद मासुलदार यांचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विद्या प्रतिष्ठानचे रमीज कारभारी, अब्दुल्ला चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

याप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे, भास्कर आडकी, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे व्हीजेएनटी शहराध्यक्ष रुपेश भोसले, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी, वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख, सोशल मिडिया अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, तनवीर गुलजार, फिरोज शेख, आयुब शेख, दत्तात्रय बडगंची, राजू पवार, दशरथ शेंडगे, महिला अध्यक्ष संगिता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला समन्वयक शशिकला कसपटे, अध्यक्ष किरण माशाळकर, कांचन पवार, संगिता गायकवाड, शोभा गायकवाड, रुक्मिणी जाधव, सरोजना जाधव, प्रमिला स्वामी, सुनिता बिराजदार, लक्ष्मी पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact