डाॅ. प्रतिभा पाटील, अनिता माळगे, वैशाली शहापुरे, अमरनाथ सोलपुरे, रवी बिराजदार, मल्लिनाथ आकळवाडे, रोहित पाटील, शशीकांत पुदे, विश्वनाथ पाटील बसवरत्न पुरस्काराने सन्मानित

बसव ब्रिगेड, सोनाई फाउंडेशनच्या बसवरत्न पुरस्काराचे वितरण: सर्वच क्षेत्रातील गुणीजनांचा गौरव: माजी आ. माने यांचे प्रतिपादन

By Kanya News ।।
सोलापूर : कृषी, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या गुणीजनांना हेरून त्यांना बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा म्हणजे बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशन यांचे कार्य उल्लेखनीय कार्याचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले. रविवार, दि. २८ जुलै रोजी सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात बसवरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात मोठ्या थाटामाटात करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप माने हे बोलत होते.

यावेळी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसेकर अध्यक्षस्थानी होते. बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, ॲड सोमनाथ वैद्य, बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैलमामा हत्तुरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, मल्हार ब्रिगेडचे सचिन सोनटक्के, शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतूबर, श्याम धुरी, धर्मराज पुजारी, जुबेर बागवान, खलिफभाई शेख, ॲड विश्वनाथ पाटील, मुख्याध्यापक संघाचे सदाशिव व्हनमाने, विठ्ठल व्हनमोरे, बाजीराव बुळगुंडे, शंकर कांबळे, नागनाथ कांबळे, सिदराया मावीनमर, हरिभाऊ गुजरे, सवेश्वर बुरकूल, जतीन निमगाव, ॲड विनयकुमार कटारे, दत्ता केरे, विनायक साळुंखे, डाॅ. वैजिनाथ कुंभार, रमेश धुरपे, कल्लप्पा पाटील, जयश्री सुतार, सरपंच सुजाता सुतार आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्दारामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.स्वयंम शिक्षा फौंडेशनच्या वतीने जगदगुरू डाॅ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि बसवारूढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त ५१ हजार लाडू वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना १० हजार छत्र्यांचा वाटप तर ५ हजार तरूणांना टी शर्टचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकेत अमित रोडगे यांनी बसव ब्रिगेडच्या कार्याविषयी माहिती दिली. सुत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.

डाॅ. अमरनाथ सोलापुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला जगत अनिता माळगे, अध्यात्मिक कार्य रवी बिराजदार, उद्योग मल्लिनाथ आकळवाडे, वैद्यकीय कार्य डाॅ. प्रतिभा पाटील, सामाजिक कार्य रोहित पाटील, शैक्षणिक कार्य वैशाली शहापुरे, कृषी शशिकांत पुदे, विधी विभागासाठी विश्वनाथ पाटील यांचा बसवरत्न पुरस्काराने सन्मान झाला.

  • यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की, बसव ब्रिगेड आणि सोनाई फौंडेशन या सामाजिक संस्थेकडून समाजातील योग्य व्यक्तींचा सन्मान बसवरत्न पुरस्काराने करण्यात आला असून, हा सन्मान देतांना अभ्यासपूर्वक नावे निवडलात. योग्य व्यक्तींचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले. विधायक कामे करणाऱ्यांच्या सोबत मी नेहमीच असणार आहे.
  • यावेळी बोलताना संतोष पवार म्हणाले की, समाजातील गुणवंताचा हा गौरव सामाजिक संस्थेकडून होत आहे. हे प्रेरणादायी असे काम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बसव भवनसाठी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
  • समाजासाठी झटणाऱ्यांच्या पाठीमागे भविष्यातही आम्ही खंबीरपणे उभारणार असल्याचे युवराज भैय्या राठोड बोलताना म्हणाले. बसव भवनच्य इमारतीच्या उभारणीसाठी नेहमी सकारात्मक राहणार असून, यासाठी भविष्य काळात होणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून देखील मंत्रालयीन स्तरावरुन प्रयत्न करण्याचे अभिवचन सोमनाथ वैद्य यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact