महावितरण बारामती परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी अंकुश नाळे रुजू

                                   अंकुश नाळे

By Kanya News ||

सोलापूर: बारामती, महावितरण बारामती परिमंडलाचे सातवे मुख्य अभियंता म्हणून अंकुश नाळे यांनी गुरुवारी (दि. २५ जुलै) पदभार स्विकारला आहे. बारामती परिमंडलातील कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. याआधी ते पुणे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते.
तब्बल साडेचार वर्षे पुणे प्रादेशिक संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अंकुश नाळे महावितरणच्या सेवेत २००९ साली अधीक्षक अभियंता पदावर दाखल झाले. त्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून प्रकाशगड व रास्तापेठ मंडल कार्यालयात काम केले आहे. मुख्य अभियंता म्हणून चंद्रपूर परिमंडलाचे व प्रकाशगड येथे विविध विभागाचे काम पाहिले आहे. याशिवाय प्रकाशगड येथे कार्यकारी संचालक (वितरण) व कल्याण येथे प्रादेशिक विभागात असताना कोकण प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही नाळे यांनी सांभाळला होता.

By Kanya News ||
सोलापूर : महावितरण बारामती परिमंडलाचे नूतन मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी पदभार स्वीकारला. बारामती परिमंडलातील कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

बारामती परिमंडलातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासोबतच तक्रारींचे विनाविलंब निवारण करणे तसेच महावितरणच्या महसूलवाढीसह प्रधानमंत्री सूर्यघर-मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कुसुम-ब सौरपंप योजना, सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) यांसह विविध योजनांना आणखी वेग देण्यात येईल असे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact