कलाकार माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवतो : सचिन गोसावी

क्रीडाप्रमाणे नाट्य क्षेत्रातही नोकरी, प्रवेश प्रक्रियेत आरक्षण आवश्यक :  संजय सावंत

 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : राज्यस्तरीय लोकनाटिका स्पर्धेत सोलापूरच्या वैभव नाट्य संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावेळी  छत्रपती संभाजीनगर  येथील प्रा.दिलीप घारे यांना रंगसाधक पुरस्काराने मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे हास्य जत्राचे सचिन गोस्वामी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख  ११ हजार रुपये व शाल, श्रीफळ असे होते. अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्यावतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला.

 कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना आपण आपली अंगभूत कला जपणे गरजेचे असते. शिक्षक हे पुस्तकी ज्ञान शिकवतात. पण अंगभूत कला विकसित करणे, हे आपलं कर्तव्य असतं. जो शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकल ज्ञान देऊन विद्यार्थी घडवतो, तोच खरा शिक्षक असतो. कला ही माणसाला आनंद आणि समाधान देते. त्यामुळे कलाकार माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवतो, असे मत लेखक व दिग्दर्शक  सचिन गोस्वामी यांनी  व्यक्त केले. नाट्य प्रशिक्षक दिग्दर्शक कलाकार डॉ. प्रदीप घारे यांना रंगसाधक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी गोस्वामी बोलत होते.

  • यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. दिलीप घारे म्हणाले,  कलेने माणूस परिपक्व होतो. कला माणसाला विशिष्ट अशा उंचीवर नेते. मी कोण आहे, याचा शोध रंगभूमीवर आल्यावर लागतो. कलाकार हा त्याच्या धुंदीमध्ये जगणारा असतो. म्हणून अनेकदा इतरांना तो विक्षिप्त वाटतो. कलाकाराला गर्दी आवडत असते. पण, त्याला गर्दीचा भाग व्हायला आवडत नाही. तो नेहमीच त्याचे वेगळेपण जपत असतो. आपला व्यवसाय आणि छंद यांची सांगड ज्या कलाकारांना घालता आली, तोच कलेचा आणि जीवनाचा खरा आनंद लुटतो.

क्रीडाप्रमाणे नाट्य क्षेत्रातसुद्धा नोकरी व प्रवेश प्रक्रियेत आरक्षण आवश्यक आहे, असे मत महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी मांडले.  प्रास्ताविक ॲड.बसवराज सलगर यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष  संजय सावंत, हास्यजत्रा फेम कलाकार सचिन गावडे, प्रवीण डाळिंबकर,  प्रा. अशोक निंबर्गी, ॲड. मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे,  विजय साळुंखे, अविनाश गोडसे, डॉ. केदारनाथ काळवणे, मिलिंद हिंगमिरे, अमित रोडगे, दत्ता गायकवाड, सुमित फुलमामडी, गोवर्धन कमटम, प्रशांत बडवे, कृष्णकांत चव्हाण, प्रमुख संयोजक ॲड. बसवराज सलगर, अस्तित्व मेकर फांऊडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

वैभव दीप नाट्य संस्थेची ‘मुलाखत’ प्रथम क्रमांक :

  • लघुनाटिका स्पर्धेत सोलापुरातील वैभव दीप नाट्य संस्थेची ‘मुलाखत’ या लघुनाटिकेने प्रथम क्रमांक मिळविला.
  • द्वितीय : नाट्यालय (सोलापूर), तृतीय : नाट्य परिषद शाखा लातूर.
  • उत्कृष्ट दिग्दर्शक : दिपक शिंदे, द्नितीय : विजय मस्के, तृतीय : आर्यन गिरवलकर.
  • लेखन  प्रथम : अभिजीत केंगार, द्वितीय : प्रतिक्षा पाटवकर, तृतीय : वैभव कवडे.
  • अभिनय (पुरुष) प्रथम : विजय मस्के, द्वितीय : प्रतिक तांदळे, तृतीय : अभिजीत केंगार.
  • अभिनय (स्त्री) प्रथम : अक्षता साळवी, द्वितीय : अपर्णा पवार, तृतीय : श्रावणी पडवी.
  •  अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे : दर्शना गुंडू.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महोत्सवाच्या अध्यक्ष संजय सावंत, प्रमुख संयोजक ॲड. बसवराज सलगर, अस्तित्व मेकर फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे, अस्तित्व मेकर्स फांऊडेशनचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *