आस्था रोटी बँकेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप
By Kanya News

सोलापूर : आस्था रोटी बँकेच्यावतीने समाजातील विविध घटकांतील गोर-गरिब, वंचित, बेघर, निराधार, यांना फराळाचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी आनंद तालिकोटी,सुहास छंचुरे आदी.
सोलापूर : आषाढी एकादशी देवायनी एकादशीचे औचित्य साधून आस्था सामाजिक संस्था ( आस्था रोटी बँक) यांच्यावतीने समाजातील विविध घटकांतील गोर-गरिब, वंचित, बेघर, निराधार, यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
फराळामध्ये, केळी, शेंगा लाडू, वेफर्स, शाबू खिचडी आदींचा समावेश होता. आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सुहास छंचुरे, वेंदात तालिकोटी, पिंटू कस्तुरे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यासाठी आस्था सामाजिक संस्थेचे सचिव शिवानंद सावळगी, उपाध्यक्ष चंद्रकांत शहा, सल्लागार हर्षल कोठारी, अनिल जमगे, डॉ. महावीर शास्त्री, सोमनाथ कोळेकर, सर्व संचालक यांचे सहकार्य लाभत आहे.