अरुण प्राथमिक शाळा, सुकळे प्रशालेत दिंडी सोहळा

By Kanya News

सोलापूर : अरुण प्राथमिक शाळा व कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत  आषाढी एकादशीनिमित्त आषाढी दिंडी सोहळा अतिशय रम्य अशा वातावरणात पार पडला. याप्रसंगी प्रथमता गोल रिंगण सोहळा आणि मधोमध विठुराया व रखमाईच्या पारंपारिक वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.

पालखी पूजन मुलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राचप्पा मिराखोर, मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू, चंद्रशेखर गुजले, सांस्कृतिक विभाग प्रमुख भारताबाई दिकोंडा, नितीन दणाणे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे आरती व पूजा करण्यात आले.

याप्रसंगी दिंडीमध्ये प्रथम मुलींचे लेझीम पथक, टाळ पथक, पालखी व वारकरी अशा पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारी सोहळा पार पाडला. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे प्रमुख शंकर चौगुले, सचिव विजयकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर रम्य अशा ढगाळ वातावरणात दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact