जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांचे आवाहन           

कन्या न्यूज नेटवर्क||

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या  भेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील दरिद्रय रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी,  त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, दि. ४ नोव्हेंबर २०२२ च्या  शासन निर्णयानुसार महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेंतर्गत कर्जाची मर्यादा रक्कम  २५ हजार रुपायांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येऊन थेट कर्ज योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रक्कम १ लाख रुपये करण्यात आली असून, यामध्ये महामंडळाचा हिस्स्रा ८५ हजार रुपये (८५ %), अनुदान रक्कम १० हजार रुपये (१० %), अर्जदाराचा सहभाग ५ हजार रुपये (५ %) असे एकूण १ लाख रुपये  (१०० %), ३ वर्षे (३६  महिने) या कालावधीसाठी द.सा.द.शे. ४ टक्के व्याज दराप्रमाणे कर्ज रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. सदर योजने अंतर्गत रक्कम  १ लाख रुपयांपर्यंतचे प्रकल्प मर्यादेपर्यंत असलेले लघू उद्योग करता येईल.

महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे परिपत्रक नुसार थेट कर्ज योजना (रक्कम १ लाख रुपये) राबविण्यासाठी  जिल्हा निहाय उद्दिष्ट, अटी शर्ती नियम निकष व पात्रतेसह परिपत्रक प्राप्त झाले आहे.उद्दिष्ट वितरण: सदर योजनेत साधारणपणे पुरुष ५० टक्के व महिला ५० टक्के आरक्षण राहील.

ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार व्यक्तीना प्राध्यान राहील.  सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

image source

सदर योजनेच्या पात्रता व निकष :-

अर्जदार मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी. मांग गोराडी, मादगी व मादिगा जातीतील असावा,  अर्जदार महाराष्ट्रातील रहीवाशी असावा.  अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.  अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल,

अर्जदाराने अर्जासोबत आधारकार्ड जोडलेल्या बैंक खात्याचा तपशील सादर करावा, अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षीत असावा.  अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर ५०० च्या वर असावा.

कर्ज मागणी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे व दस्तऐवज खालीलप्रमाणे.:

जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा), अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (३ लाख रुपयांपर्यंत), नुकतेच काढलेले फोटो (दोन), अर्जदाराचा शैक्षणिक पुरावा/शाळेचा दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे, त्या जागा उपलब्धेचा पुरावा भाडे पावती, करारपत्र) व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र व अनुभव दाखला. यापूर्वी शासकीय कर्ज योजनेचा व अनुदानाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र ॲफेडेव्हिटसह, शॉपॲक्ट/ग्रामसेवकाचे व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला, कोटेशन (व्यवसायासंदर्भात साहित्य/माल खरेदीचे दरपत्रक). अर्जदारास महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे प्रमाणपत्रे/करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज प्रक्रिया:

  •  कर्ज प्रकरण कार्यालयाकडे प्राप्त झाल्यास, परिपूर्ण असे कर्ज प्रस्ताव लाभार्थीच्या निवडीसाठी, प्रथम लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेसाठी व मंजूरीस्तव सादर करण्यात येतील,  प्राप्त झालेले कर्ज प्रस्तावाची संख्या उहिष्टांपेक्षा जास्त असल्यास, लाभार्थीची निवड चिठ्ठीव्दारे (लॉटरी पध्दतीने) करण्यात येईल. अर्जदाराच्या सिबील क्रेडीट स्कोअर ५०० च्या वर आहे किंवा कसे याबाबत कर्ज मंजूर झाल्यानंतर अहवाल सादर करावा लागेल.
  •  कर्ज मंजूरीची प्रक्रिया झाल्यानंतर कर्ज प्रकरणी कर्ज वसुलीसाठी दोन सक्षम जामिनदार घेण्यात येतील.  एक जामिनदार-शासकीय/निमशासकीय नोकरदार/अनुदानीत संस्था मधील कर्मचारी असावा, त्यांचे कार्यालयाकडून वसुलीसाठी हमीपत्र घ्यावे लागेल. (जामिनदार कागदपत्रे: १०० रुपयांच्या  बॉन्डवर प्रतिज्ञापत्र, कार्यालयाचे ओळखपत्र, मागील तीन  महिन्याचे पगार पत्रक, मागील सहा महिने बैंक स्टेटमेंट पासबूक झेरॉक्स, आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स. २ फोटो, इ.)
  •  एक जामिनदार मालमत्ताधारक / जमीनदार असावा, त्यांचे मालमत्तेवर महामंडळाच्या नावे कर्जाचा बोजा नोंद करावा लागेल. (जामिनदार कागदपत्रे सातबारा किंवा  ८ -अ उत्तारा, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड, १०० रुपयांच्या बाँडवर  प्रतिज्ञापत्र व इ.)  सहभाग रक्कमेपोटी पाच हजार रुपयांचा धनाकर्ष महामंडळाचे नावे जमा करावा लागेल. कर्ज वितरणापूर्वी लाभार्थीकडून वसुलीपोटी २० उत्तर दिनांकित धनादेश घेण्यात येतील. कर्जदाराच्या वारसाचे १०० रुपयांच्या बॉन्डवर वारसदार म्हणून प्रतिज्ञापत्र, इतर वैद्यानिक दस्ताऐवजांची पुर्तता करणे बंधनकारक आहे. तीन  वर्षे (३६ महिने) कालावधीसाठी द.सा.द.शे. ४ टक्के  व्याज दराने कर्ज रक्कम वितरीत केली जाईल.
  • जिल्हा कार्यालय सोलापूर मार्फत थेट कर्ज योजनेमध्ये कर्ज मागणी अर्ज वितरण दि. १ जुलै २०२५  ते दि. २० जुलै २०२५  पर्यंत करण्यात येणार आहे. कागदपत्रांच्या पुर्ततेसह दि. १ जुलै २०२५  ते दि. २० जुलै २०२५  रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहेत.

तरी इच्छुक वर उल्लेखीत जातीतील गरजू  व होतकरुनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर, सोलापूर येथे मुळ जातीचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रासह स्वतः उपस्थित रहावे, त्र्यस्थांकडे अर्ज दिला जाणार नाही किंवा अर्ज स्विकारला जाणार, याकरिता कार्यालयात स्वतः प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकार आहे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, आर. एच चव्हाण, यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *