साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार : उत्तमप्रकाश खंदारे यांची माहिती
यंदाही ४५ हून अधिक मंडळे सहभागी होणार

By Kanya News||

सोलापूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूरच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा १०४ वा जयंती महोत्सव दि. १ ऑगस्ट २०२४ पासून सोलापूर शहर जिल्हयामध्ये मोठया उत्साहात साजरा होणार असून, यंदाच्यावर्षी गत वर्षीच्या तुलनेत ४५ हून अधिक मंडळे सहभागी होणार आहेत. रविवार, दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यरत्नांच्या भव्य जयंतीची मिरवणूक होवून शहराच्या जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे, अशी माहिती माजी राज्य मंत्री व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष उत्तमप्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ वा जयंती महोत्सव गुरुवार, दि. १ ऑगस्ट २०२४ पासून ते रविवार, ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत विविध रुपाने उपक्रम होणार आहेत.  साहित्वरत्त अण्णाभाऊ साठे यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहरामध्ये अनेक जयंती उत्सव मंडळाच्या रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले आहे. साहित्यरत्नाने संयुक्‍त महाराष्ट्राचा चळवळ त्यांच्या शाहीरच्या माध्यमातून या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र मिळवून देत असताना ज्या १०५ हुतात्माचं बलिदान झालं त्याची जाणीव ठेवून त्यांना अभिवादन करण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मोठया प्रमाणावर रक्‍तदान शिबीर, अभिवादनपर गीतगायनाने सा हित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे .

            उत्तमप्रकाश खंदारे

दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी संपूण शहर, जिल्हयामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दि. २ व ३ ऑगस्ट रोजी शहर व जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम होणार आहे.रविवार, दि . ४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळयापासून मिरवणूक काढण्यांत येणार आहे . मिरवणुकीने जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे.
या मिरवणुकीची सुरुवात रविवार, दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता सोलापूर शहरातील प्रमुख मान्यव र सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,पोलीस आयुक्त एम.राजकुमार, खा.प्रणितीताई शिंदे, काँग्रेस पक्षाचे व दलित समाजाचे राष्ट्रीय नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख आदी विविध मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणूतिची पुजा होवून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीमध्ये गतवर्षी ४५ मंडळे सहभागी झाली होती. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ४५ मंडळे सहभागी होणार आहेत. जवळपास ३५ कि.मी. पर्यंत लांबीचा परेग या मिरवणृकीमध्ये होता. यंदाच्या वर्षी अधिक मंडळे वाढून भव्य आणि द्व्यि अशा नेत्रदिपक मिरवणूक आकर्षक सजावटीने विविध उपक्रमाने सामाजिक संदेशदेणारे देखावे अशा माध्यमातून ही मिरवणूक होणार आहे.
या मिरवणुकीसाठी सोलापूर शहर जिल्हयातील तमाम साहित्यरत्न समिती समन्वयक अण्णाभाऊ साठे प्रेमीनी विशेषत: मातंग समाजातील सर्व समाजबांधव, माता-भगिनी यांनी मोठया प्रमाणात मिरवणूकीमध्ये सहभागी होवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारचं व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे आणि समाजाच्या ताकतीचे शक्ती प्रदर्शन करावे, असे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवती जयंती समितीचे अध्यक्ष खंडू आप्पा बनसोडे यांनी केले आहे. या पत्रकारपरिषदेला मध्यवतीचे सचिव विशाल लोंढे, मिरवणूक प्रमुख सुरेश अप्पा पाटोळे, कार्याध्यक्ष तुषार खंदारे, उपाध्यक्ष सनी बागडे, साक्षांत लोखंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact