आंध्रप्रदेशातील सात प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास भेट
By Kanya News||
सोलापूर : आंध्रप्रदेशातील सात प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास भेट दिली. आंध्रप्रदेश येथून आलेल्या सात प्रतिनिधींच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी गुरुवार, दि. २५ जुलै रोजी भैय्या चौक येथील स्मृतीस्थळ येथे भेट दिली. या शिष्टमंडळात माजी खासदार पि.मधू यांच्यासह सांस्कृतिक, साहित्यिक,अभ्यासक व लोक विज्ञान चळवळीचे प्रशिक्षक यांचाही सामावेश आहे.
डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कार्य याबाबत दस्तऐवज बनवून सांस्कृतिक स्वरूपात जागतिक पातळीवर सादरीकरण करण्याचा त्यांचा उद्देश्य आहे. याप्रसंगी ते सोलापूरच्या या भूमिपुत्राची यशोगाथा पाहिल्यानंतर सोलापूरच्या प्रसारमाध्यम बांधवांशी त्यांनी संवाद साधला.
या शिष्टमंडळात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार पि.मधू यांच्या नेतृत्वाखाली माकीनेनी बसव पुन्नय्या विज्ञान केंद्र विजयवाडाचे साहित्यिक व अभ्यासक के. स्वरूपराणी , पि. मुरलीकृष्णा, पि.विजया, जी. नारायणराव, यू. वी. रामराज, टी.क्रांतिकिरण आदींचा समावेश होता.
डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जीवन चरित्रावर आधारित प्रदर्शन आणि दस्तऐवज दाखवले जाणार आहे. जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या कोटणीसांची प्रेरणा घेऊन जात असून, त्यांच्या त्यागाला व कार्याला विनम्र अभिवादन केले, अशी प्रतिक्रिया पि.मधू यांनी व्यक्त केले.यावेळी ऍड.अनिल वासम, श्याम आडम आदींची उपस्थिती होती.