image source
लक्षांकानुसार लॉटरी पध्दतीने शाळकरी मुलांकडून लाभार्थ्यांची निवड चिठ्ठी काढणार
by kanya news||
सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक संरक्षण औजारे योजनेची दि. २० ऑगस्ट रोजी लॉटरी पद्धतीने सोडत निघणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सोलापूर सेस फंडातून पिक संरक्षण औजारे, उपकरणे (थ्री पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटड स्प्रेपंप ,ब्रश कटर ,सोलार इन्सेंक्ट ट्रॅप ) ट्रॅक्टरचलित औजारे (रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर, विडर, पेरणी यंत्र, कल्टी व्हेटर) कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने पुरविणे ( ५ एचपी सबमर्सिबल पंप संच, डिझल इंजिन) कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे पुरविणे ( कडबाकुट्टी, ताडपत्री स्लरी, फिल्टर) ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्वावर देण्यात येणार आहे.
image source
वरील औजरासाठी शेतकऱ्यांना पंचायत समिती स्तरावर अर्ज करण्यासाठी दि . ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार दि. २० ऑगस्ट २०२४रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर औजारांसाठी बाबनिहाय लक्षांकानुसार लॉटरी पध्दतीने शाळकरी मुलांकडून लाभार्थ्यांची निवड चिठ्ठी काढण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे.