Precision Camshaft donates 25-seater bus to Solapur University
प्रिसिजन कॅमशॉफ्टतर्फे सोलापूर विद्यापीठास 25 आसनी बस भेट !
कन्या ||
सोलापूर : प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड, सोलापूर यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत एका आधुनिक व वातानुकूलित 25 आसनी बस देणगीच्या स्वरुपात भेट देण्यात आली. विद्यापीठ परिसरात आयोजित कार्यक्रमात या बसचा चावी प्रदान समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी बसची चावी सुपूर्द केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, अधिसभा सदस्य मल्लिनाथ शहाबादे, प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, डॉ. राजेश गुराणी यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे, आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी केले.

कुलगुरू प्रा. डॉ. महानवर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच अभ्यासभ्रमंतीसाठी या बसचामोठा हातभार लागणार आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी इतरत्र जाण्यासाठी या बसचा मोठा उपयोग होणार आहे. बसची देणगी देण्यात आल्याने प्रिसिजन कंपनीचे कुलगुरु डॉ. महानवर यांनी आभार मानले. सोलापूर विज्ञान केंद्राला देखील प्रिसिजन फाऊंडेशनने मदत करावी, असे अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रिसिजनच्या सुहासिनी शहा म्हणाल्या, शिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात योगदान देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही बस उपयुक्त ठरेल.
