राज्य मानांकित प्रौढ एव्हरग्रीन कप स्पर्धा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : पुणे डेक्कन जिमखाना येथे झालेल्या राज्य मानांकित प्रौढ एव्हरग्रीन कप स्पर्धेत सोलापूरच्या मनिष रावत यांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी ही कामगिरी 5० वर्षापुढील वयोगटात केलेली आहे.
रावत यांनी ठाण्याच्या तेजस नाईक यांचा 11-3 12-14 11-4 11-7 अशा फरकाने पराभूत करून अजिंक्यपद प्राप्त केले. त्यांनी सेमी फायनलमध्ये पुण्याच्या नचिकेत देशपांडे यांना हरवले. मनिष रावत यांनी सलग दोन राज्य मनांकित स्पर्धेत अजिंक्य राहिल्याने त्यांचा सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, सचिव झेड.एम. पुणेकर व सर्व खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.

