महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे स्तुत्य उपक्रम

 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर :  श्रीवास्तव नाभिक समाज सेवा प्रतिष्ठानच्या महिला मंडळाने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर बझार – लष्कर येथील आधार केंद्रात झालेल्या या  समारंभाला सीमा यलगुलवार, डॉ. विनयरेखा म्याकलवार, डॉ. माधुरी पारपल्लीवार, अलका ताटे, भारती हडपद, सुनीता दळवी, शारदा श्रीमंगले, पुष्पा महाराज आदी उपस्थित होते.

  • स्वागत मंडळाच्या अध्यक्षा साधना हिरापूरकर यांनी करुन कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. मंडळाच्या प्रदेश निमंत्रक वनिता मालतूमकर यांनी सेवा प्रतिष्ठान आणि महिला मंडळाचे कार्य, पुढील वाटचालीची दिशा उलगडून सांगत सर्वांनी मिळून जिद्दीने समाजाचा विकास साधला पाहिजे, असे म्हणाल्या.
  • वक्त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम, बचत गट, महिला सक्षमीकरण धोरण, महिला सुरक्षा याविषयी उपस्थित महिलांनी मागर्दर्शन केले. आधार केंद्राच्या सुजाता बत्तुल, ॲड.रेखा गोटीपामुल यांनीही केंद्राच्या कामकाजासह त्या अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सखी वन स्टॉप सेंटर (पिडीत महिलांसाठी मदत केंद्र) याची सविस्तर माहिती दिली.

    त्यात प्रामुख्याने  वैशाली एक्केली,  मीरा श्रीयाळ, जयश्री म्याकलवार, रूपा म्याकलवार, आशा म्याकलवार, मधू म्याकलवार, सारिका म्याकलवार, विनिता म्याकलवार, किरण मालतूमकर, कलावती हिरापुरे, रेखा मालतूमकर, ललिता मालतुमकर, वंदना मालतूमकर, ज्योती मालतूमकर, सिद्धम्मा चिंताकिंदी, नीलम मालतूमकर, मीना म्याकलवार, शांता भरतनूर, शशिकला मालतुमकर, दिपाली श्रीमंगले, पुष्पा काळे, ललिता नलावडे, सुनिता श्रीमंगले, प्रीती मंगले, जयश्री सर्दनकर, स्वरुपा कोडपाक, अरुणा म्याकलवार, सरस्वती सर्दनकर, अन्नपूर्णा सर्दनकर, मंगला सर्दनकर, सुरेखा कोडपाक, शोभा सर्दनकर, स्वरुपा सर्दनकर, रुपाली वड्डेपल्ली, अनिता श्रीमंगले, अरुणा  म्याकलवार, अरुणा एकेल्ली, अनुराधा चिंताकिंदी, मीनाक्षी म्याकलवार, शालन जोगीपेठकर, राजुबाई दोंतूल, शांता  बिराजदार, कलावती हिरापुरे, सुनीता रायसूरकर, नागमणी कंकनाळ, शांता कानागड्डी, अनुराधा म्याकलवार, नागेश्वरी फरिदाबादकर, यलेश्वरी नल्ला, सुनंदा चिंताकिंदी, अर्चना चिंताकिंदी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *