अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते वितरण
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने सोलापूर पुरवठा विभागाच्यावतीने समाजातील वंचित घटकांपर्यंत शिधापत्रिकांचा लाभ पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते विधवा, परितक्त्या आणि अनाथ, वंचित अशा एकूण 19 लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित शिधापत्रिका वितरण कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, निरीक्षण अधिकारी प्रफुल्ल नाईक, नितीन कांबळे उपस्थित होते.
अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाल्या…
“समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे. पुरवठा विभागाने या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास दृढ होतो.” त्यांनी उपस्थितांना पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन अधिक वंचित लाभार्थ्यांची शिफारस करण्याचे आवाहनही केले.
-
पुरवठा अधिकारी सरडे म्हणाले…
-
“अप्पर जिल्हाधिकारी यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन प्रेरणादायी आहे. या उपक्रमात नितीन कांबळे यांचे सहकार्य लाभले असून, त्यांनी गोरगरीब महिलांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.”
-
जननायक विचारमंच व शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संघाचे प्रतिनिधी नितीन कांबळे यांनीही हा संवेदनशील उपक्रम राबवून विधवा परितक्त्या महिलांना मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे असे उपक्रम नियमितपणे होऊन वंचित घटकातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
लाभार्थींची नावे:
रेश्मा शेडम, जया चव्हाण, वर्णा वाघमारे, पूजा पेद्दी, प्राजक्ता कांबळे, अंबिका देवकते, गायत्री विटकर, शशिकला देवकरे, अलका मेलगिरी, पूजा चव्हाण, मंगल लोंढे, लानुबाई दुपारगुडे, दिलशाद शेख, तहेरा बक्षी, रेश्मा शेख, श्यामल रणदिवे, विमलाबाई कांबळे, नौशादबी कातनकर, कल्याणी रमेजा.