संदल मिरवणूक, कव्वाली, दीपोत्सव, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील हजरत पीर शेख मदारशाह कादरी, अतिकी, अलकदिरी (रहेमान) यांचा 25 वा उरुस सोमवार दिनांक २८ जुलैपासून प्रारंभ होत आहे.
हलकट्टा शरीफ येथील हजरत साहेब कादरी यांचे जानशीन हजरत ख्वॉजा सय्यद अबुतुराबशाह कादरी, चिश्ती, यमनी, बंदानवाजी, तुराब कादरी यांच्या असिम कृपाशिर्वादाने जेऊर (अक्कलकोट स्टेशन रोड) येथील हजरत पीर शेख मदारशाह कादरी, अतिकी, अलकदिरी (रहे.) यांचा उरुसनिमित्त सोमवार, दि. 28 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता गावातील हजरत राजेबागसवार दर्गाहपासून संदल शरीफ (गंध)ची मिरवणूक निघणार आहे.
प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत संदलचा कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री 10 वाजता सोलापूर येथील प्रसिद्ध मुन्ना कव्वाल यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार, दि. 29 जुलै रोजी चिरागाँ (दिपोत्सव) व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार, दिनांक 30 जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता जियारत व फातेहाखानीनंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व हिंदू-मुस्लिम भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जानशीन हजरत महिबूबशाह कादरी खलिफा-ए-हजरत साहेब कदिर यांनी केले आहे.