अमृतेश्वर शिवाचार्य (जिंतूर) महास्वामीजींचे आशीर्वचन: शिव महापुराण कथेची सांगता

श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ, एस. एस. साबळे वीरशैव ट्रस्टचा उपक्रम

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : विवाह हा ‘धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष’ या चार पुरुषार्थांपैकी धर्म, अर्थ, आणि काम हे तीन पुरुषार्थ पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे. असे प्रतिपादन श्री अमृतेश्वर शिवाचार्य (जिंतूर) महास्वामीजींनी केले आहे.

शिवानुभव मंगल कार्यालयात श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ व एस. एस. साबळे वीरशैव ट्रस्टच्या वतीनं आयोजित शिव महापुराण कथेची सांगता झाली. त्यावेळी अमृतेश्वर महास्वामीजींनी शिव-पार्वती यांच्या विवाहविषयी आशीर्वचन दिले.

एस. एस. साबळे वीरशैव ट्रस्टचे सिद्धाराम साबळे, शिवयोगी बनशेट्टी परिवार व शिवानंद बुट्टे या दाम्पत्यांकडून शिव महापुरण ग्रंथाचे पूजन करण्यात आल. वैदिक मंडळाच्या माहेश्वारांकडून पाच मंगलाष्टकाने पार्वती परमेश्वराचा विवाह सोहळा पार पडला.

शिव पुराणात, शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची कथा सांगितली आहे. ही कथा हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते आणि या कथेला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. विवाह म्हणजे प्रेम, भक्ती आणि समर्पण यांचे प्रतीक आहे. विवाहामुळे कुटुंबातील सदस्यांना एकमेकांवर प्रेम आणि विश्वास ठेवण्याची शिकवण मिळते. शिवपुराणानुसार या कथेचे वाचन केल्याने घरात सुख-शांती नांदते. कुटुंबातील कलह दूर होतात आणि जीवनात यश मिळते.

वैदिक विवाह म्हणजे, वेदांमध्ये सांगितलेल्या विधी आणि मंत्रांच्या आधारावर होणारा विवाह संस्कार. हा विवाह दोन व्यक्तींना (वर आणि वधू) धार्मिक आणि सामाजिक बंधनात बांधतो. यात अनेक विधी आणि मंत्रांचा समावेश असतो. ज्याद्वारे त्यांचे जीवन पवित्र मानले जाते आणि त्यांना पुढील पिढीसाठी तयार केले जाते.

वैदिक विवाहाचा महत्व:  वैदिक विवाह हा वेदांमध्ये सांगितलेल्या विधी आणि मंत्रांच्या आधारावर होतो. विवाह हा एक महत्वाचा संस्कार मानला जातो. ज्यामध्ये दोन व्यक्तींना धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्र आणले जाते. वैदिक विवाहानुसार, वधू- वर एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारतात आणि त्यांचे जीवन धर्माचरण, सहनशीलता, आणि सहकार्यावर आधारित असते. विवाह कुटुंबांना आणि समाजाला एकत्र आणतो. पुढील पिढीसाठी एक आधार तयार करतो. वैदिक विवाहानुसार, विवाह हे ‘धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष’ या चार पुरुषार्थांपैकी तीन (धर्म, अर्थ, आणि काम) पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे.

वैदिक विवाहातील मुख्य विधी आहे गणपती पूजन. विवाहाची सुरुवात श्रीगणेश पूजनाने होते. जेणेकरून कोणतेही विघ्न येणार नाही. वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले जाते, जे वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. पुरोहितांनी संस्कृत मंगलाष्टक वचनांचे पठण केल्याने वधू-वरांचे त्यांचे जीवन मंगलमय होतो.

 

·        सप्तपदी : या विधीमध्ये वाधुसमावेत सात पावले टाकताना वधू-वरांच्या संबंधी अपेक्षा,  तसेच वधूच्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव              याचे दिग्दर्शन आहे.

·         सप्तपदी : पहिले पाऊल : सुंदर अन्न तयार करण्यासाठी व एकनिष्ठ वागण्यासाठी.

·         दुसरे पाऊल : धैर्य आणि सामर्थ्य ठेऊन कुटुंब आनंद राहण्यासाठी.

·         तिसरे पाऊल: तू माझ्याबरोबर.

·          तीन पाऊल : धनप्राप्त करून देणारी व संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करण्यासाठी.

·         चौथे पाऊल: संसारात सुख वाढवण्यासाठी हो.

·         पाचवे पाऊल: संतती वाढवण्यासाठी आणि सद्गुणी संतती निर्माण करण्यासाठी.

·         सहावे पाऊल : सर्व ऋतुमध्ये सुख देण्यासाठी.

·         सातवे पाऊल : कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करण्यासाठी.

यावेळी श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ संचलित वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्राच्या बांधकामासाठी राजशेखर कोले यांनी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली. एस.एस. साबळे वीरशैव ट्रस्टच्यावतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. वैदिक मंडळाच्यावतीने  संस्थापक डॉ.शिवयोगी शास्त्री होळीमठ, अध्यक्ष वेदमुर्ती बसवराज पुराणिक,  कल्लय्या गणेचारी यांनी श्री अमृतेश्वर शिवाचार्य (जिंतूर) महास्वामीजींचा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *