जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संगिता खंदारे यांचे आवाहन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : बेरोजगारांच्या सेवा पुरविणाऱ्या सहकारी संस्थांनी आपले दरपत्रक सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संगिता खंदारे यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयात सहा महिन्याच्या कालावधीकरिता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने शिपाई तसेच अकरा महिन्यांसाठी सफाईगार पदाची सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत बेरोजगार संस्थांकडून विनानिवीदा मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरिता दरपत्रक मागविण्यात येत आहे.
सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी २ अकुशल शिपाई व १ अर्धवेळ सफाईगार अकुशल पदांची सेवा आवश्यक असल्याचे सहायक आयुक्त संगिता खंदारे यांनी कळविले आहे.
तरी जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या तसेच उपरोक्त पदांची सेवा पुरविण्यास इच्छुक असणाऱ्या बेरोजगारांच्या सेवा पुरविणाऱ्या सहकारी संस्थांनी आपले दरपत्रक व इच्छापत्र दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत या कार्यालयास सादर करावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पार्क चौक, नॉर्थकोट, सोलापूर- ४१३००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक (०२१७- २९९२९५६) येथे संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संगिता खंदारे यांनी कळविले आहे.