सिद्धेश वीर

महाराष्ट्र V/S त्रिपुरा रणजी सामना: त्रिपुरा सर्वबाद २७०;  दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राच्या ३ बाद २३५ धावा

  • गुर्बानी, वाळुंजचे चार बळी

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या शेवटच्या रणजी सामन्यात दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने पहिल्या डावात ७२ शतकात ३ बाद २३५ धावा केल्या आहेत. कर्णधार अंकित बावणे ३१ तर सिद्धेश वीर शतकाच्या उंबरठ्यावर असून, तो ९३ धावांवर खेळत आहे. महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी अद्यापही ३५ धावांची गरज आहे.

दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या सत्रातील रजनीश गुर्बानीचे चार बळी त्यानंतर दुपारच्या व शेवटच्या सत्रात सिद्धेश वीरच्या नाबाद ९३ धावा आणि यश क्षीरसागरचे दमदार अर्धशतक आणि त्यांनी केलेली १४४ धावांची भागीदारी. दुसऱ्या दिवशी सकाळी केवळ १ तासात १२ षटकात त्रिपुरा संघाचा पहिला डाव तेज लंदाज रजनीश गुर्बाणीने घेतलेले ४ बळी आणि हितेश वाळुंजच्या चौथ्या बळीमुळे १०१.२ षटकात २७० धावांवर आटोपला.

                                                                             यश क्षीरसागर

कालच्या ५ बाद २३० वरून सकाळी शरथ आणि रजतने डाव पुढे नेला. तेव्हा कर्णधार अंकितने चेंडू पुन्हा रजनीशकडे सोपविला. चौथ्या, सहाव्या क्रमांकानंतर दहाव्या षटकात रजनीशने एस. शरथ (७१), एम.बी.मुरा सिंग (१), संकर पॉल (१७) यांना बाद करत धक्के दिले. सोबतच हितेशनेदेखील रजत डे (१७) याला पायचीत करत चौथा बळी मिळविला. लगेच पुढच्या षटकात गुर्बानीने चरण पॉल (१) याला त्रिफळाची करत त्रिपुराचा पहिला डाव संपविला.

रजनीश गुरबानी ३७/४ बळी, हितेश वाळुंज ६७/४ बळी, रामकृष्ण घोष व वीर यांनीने प्रत्येकी एकेक बळी मिळविला. दहा मिनिटांच्या अवधीनंतर महाराष्ट्राचा पहिला डाव रणजी पदार्पण करणारा किरण चोरमलेने पवन शाहसोबत सुरू केला.  पण तिसऱ्याच षटकात एम.बी मुरा सिंगने किरण चोरमले (२) याला यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर आलेल्या सिद्धेश वी सोबत जेवणासाठी खेळ थांबला तेव्हा फलकावर १६ शतकात ३५ धावा झाल्या  होत्या. जेवणानंतर खेळ सुरू झाल्यावर वीरने पवनसोबत एकूण ४५ धावांची भागीदारी केली असताना पवन (२४) गोलंदाज एस. सरकारकडेच झेल देऊन बाद झाला. यश क्षीरसागरने वीरसोबत चहापानपर्यंत संघाचा धावफलक हलता ठेवत ४२ षटकात २ बाद १२० धावा केल्या.

                                                                                      हितेश वाळुंज

दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात महाराष्ट्राचा दमदार फलंदाज सिद्धेश वीरने यश क्षीरसागरसोबत दुसऱ्या गड्यासाठी १४४ धावांची भागीदारी रचली. यश क्षीरसागर (७१) वर संकर पॉलकडून बाद झाल्यावर कर्णधार अंकित बावणे फलंदाजीला आला. सिद्धेश सोबत ४२ धावांची भागीदारी केली आहे. रणजी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दमदार शतक ठोकलेल्या सिद्धेश्वरला या सामन्यात शतक साजरे करण्यासाठी अद्यापही ७ धावांची गरज आहे. उद्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघ किती धावांची आघाडी घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

                                                                        रजनीश गुर्बानी

आज दुसऱ्या दिवशी करमाळा तालुक्यातील जेऊरच्या भारत हायस्कूलचे २०० विद्यार्थी प्राचार्य  ए.जी. सरोदे, बी.सी. सरक, आर.के. फडतरे, जी. आर. पाटील, रूपनवर, सरडे, डी.बी. वाघमोडे,पोळ, सपकाळ, शिंदे, बंडगर,  शिपाई हेळकर उपस्थित होते.  उप आयुक्त अशिश लोकरे, मनपा सह आयुक्त शशिकांत भोसले हेदेखील सामना पाहण्यासाठी आले होते.

रमाळा तालुक्यातील जेऊरच्या भारत हायस्कूलचे २०० विद्यार्थी प्राचार्य ए.जी. सरोदे, बी.सी. सरक, आर.के. फडतरे, जी. आर. पाटील, रूपनवर, सरडे, डी.बी. वाघमोडे,पोळ, सपकाळ, शिंदे, बंडगर, शिपाई हेळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact