अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ६६ लाख १६ हजाराची सुगंधीत तंबाखू जप्त
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : कामती येथे ६६ लाख १६ हजाराची सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.
मंद्रुप रस्त्यावरून मोहोळकडे संशयितरित्या येणाऱ्या (एमएच- ४० एके- ८९९३) या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये विमल पानमसाला २००० बॉक्स, व्ही-१ सुगंधित तंबाखू २००० बॉक्स, विमल पानमसाला-२४००० पाकिटे, व्ही-१ सुगंधित तंबाखू- २४००० पाकिटे व विमल पानमसाला-१८०० पाकिटे असे प्रतिबंधित अन्न पदार्थ एकूण ६६ लाख १६ हजार ६०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढली कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालक विजय शिवानंद कंबार (रा. आझाद रोड, आळणावर, धारवाड कर्नाटक), साठा मालक सुजित खिवसारा (रा पुणे), वाहन ट्रान्सपोर्टर मालक रफिक मेनन, वाहन मालक लक्ष्मी सुनिल रहागडाले यांच्याविरूध्द कामती पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई सहायक आयुक्त सुनिल जिंतुरकर, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर, मंगेश लवटे, उमेश भुसे, नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने पुर्ण केली आहे.