समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा उपक्रम

 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत  जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ पुरी (ओरिसा) येथे दर्शनासाठी जाणार आहेत, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली.

” देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा,  इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत. जिथे पुण्य कर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. सदर बाव विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती, अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू करण्यात आली आहे.

दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी  पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये श्री. जगन्नाथ मंदिर, पुरी (ओरिसा) या ठिकाणासाठी तीर्थदर्शनाकरिता पात्र ८०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर ते श्री जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणी दि. ७ फेब्रुवारी २०२५ पासून ते दि. १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तीर्थदर्शनास जाणेकरिता मान्यता दिलेली आहे.

सदरील नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडीकल स्टाफ (नर्स), सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सोबत असणार आहेत. तीर्थदर्शनास जाण्यासाठी रेल्वे आरक्षित करण्यात आले  आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  सुलोचना सोनवणे यांनी दिलीं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *