कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २७ ऑक्टोबर-

 आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-१९ या साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यांमध्ये वर्ष २०२१ साठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थकेअर क्षेत्राविषयक विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी हेल्थकेअर क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी उमेदवारांना लाभणार आहे. याबाबतची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे

                  प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था यांच्यामार्फत कोविड फ्रंटलाईन वर्कर- सॅम्पल कलेक्शन सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट,  मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट, ॲडव्हान्स केअर सपोर्ट या सहा अभ्यासक्रमांचे संस्थात्मक तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

                  या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना प्रशिक्षण पूर्णपणे नि :शुल्क दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https//:forms.gle/SSXuPWCV8UyG3mfu8 या लिंकवर उपलब्ध असणाऱ्या गूगल फॉर्मच्या माध्यमातून आपली माहिती भरावी.

             अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला परिसर (नॉर्थकोट) पार्क चौक, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा (०२१७-२९५०९६५) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact