परिक्षेचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सहकार विभागामार्फत घेण्यात आलेल्या जीडीसी अँन्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा 2024 चा निकाल सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून घोषीत करण्यात आला आहे, अशी माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली.
सदर निकाल https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परिक्षार्थ्यांना लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येईल. पीडीएफमध्ये https://sahakarayukata.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर “महत्वाचे दुवे मधील जी. डी. सी. अँन्ड ए मंडळ” येथे पहावयास उपलब्ध राहील.
फेरगुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थीना दि ५ जानेवारी २०२५ (रात्री १०.३० वा.) पर्यंत https://gdca.maharashtra. gov. in या वेबसाईटवर परिक्षार्थ्यांना लॉगईन व पासवर्डचा वापर करुन अर्ज करता येईल. फेरगुण मोजणी करण्यासाठी परिक्षार्थी यांनी फेरगुणमोजणी शुल्क भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाव्दारे भरावे. बँक चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. ५ जानेवारीपर्यंत राहील. सदर चलन बँकेत दि. ८ जानेवारी २०२५ पर्यंत या कालावधीत भरणा करावे. विहीत तारखेनंतर प्राप्त होणा-या अर्जावर विचार करण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक (०२१७-२६२९७४९) तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, ई ब्लॉक, पहिला मजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी केले आहे.