कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २५ ऑक्टोबर-
विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश) येथे श्रीगंता कनका राव आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये उमाबाई श्राविका विद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. १४ ते १६ वर्षे वयोगटातील ५५ किलो वजनी गटात सार्थक घाडगे याने काता / फाइट या प्रकारात सुवर्ण व कास्यपदक पटकविले. ४० किलो वजनी गटात प्रविण गुंड याने काता या प्रकारात रौप्यपदक मिळवले.
सोलापुरात शौर्य स्पोर्ट्स कराटे अकॅडमीतर्फे शिवदारे मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सोनल शिंदे हिने रौप्य , कास्य पदक मिळवले. भक्ती शिंदे हिने सुवर्ण , कास्यपदक पटकावले.
राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, दीप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी अभिनंदन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक दीपक कळसे, क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
