पुणे येथे महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाने पटकविला व्दितीय क्रमांक

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर  : पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत सोलापूर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील ” स्नुफी ” या श्वानाने द्वितीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत सोलापूर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील पथकाने श्वानास घेवून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. श्वान पथकातील ” स्नुफी ” या श्वानाने ” वस्तुच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे व वासावरून गुन्हेगाराला ओळखपरेड मध्ये ओळखणे ” या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेत प्रथम हस्तक-सफौ- लक्षमण गणगे, दुय्यम हस्तक – पोह शिवानंद कलशेट्टी यांना पुरस्कार मिळाले आहे. दि. ६ डिसेंबर ते दि. १२ डिसेंबर २०२४ या कालावधीत १९ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

  • ” स्नुफी ” या श्वानाने गुन्हे शोधकचे प्रशिक्षण श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे येथे पुर्ण करून दि.२५ ऑक्टोबर २०१९ रोजी दाखल झाले आहे. तेव्हापासून बरेच गुन्हे उघडकिस आणण्यास मदत केली. त्यातील काही उघड घरफोडींच्या गुन्हयांची माहिती पुढीलप्रमाणे—-
  •  १) एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भादवी कलम ४५४, ४५७,३८० नुसार श्वानाने ज्वेलरी बॉक्सच्या वासावरून गुन्हेगाराचा शोध लावला.
  • २) जोडभावी पोलीस ठाणे येथे भादवी कलम ३०२ नुसार  श्वानाने चप्पल व दगडाच्या वासावरून आरोपीचे घर दाखविले, नुकताच पार पडलेल्या १९ वा पोलीस कर्तव्या मेळावा २०२४ मध्ये वस्तुच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे, व वासावरून गुन्हेगाराला ओळख परेडमध्ये दाखविणे यामध्ये श्वानाने माहाराष्ट्र राज्य मध्ये व्दितीय क्रमांक पटकविला आहे.

सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूर शहरकडील सफौ लक्ष्मण गणगे, पोह शिवानंद कलशेट्टी व पोशि रतन गनुरे यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *