आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : रोप फाऊंडेशन सोलापूरच्यावतीने रविवार, दि. २२ सप्टेंबर  ते दि. २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्राचे युवा नेते आमदार  रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोप सांस्कृतिक महोत्सव: २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोप रोप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोप सांस्कृतिक महोत्सव : २०२४ अंतर्गत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनीसाठी सांस्कृतिक महोत्सव, विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.  फक्त महिलांसाठी   भजन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.स्केटींग स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत गोविंदश्री चौक, जुळे सोलापूर येथे करण्यात आले आहे.

मोफत बालक्रिडा प्रशिक्षणाचे आयोजन दि. २३ सप्टेंबर २०२४ ते दि. १० ऑक्टोंबर २०२४ रोजीपर्यंत करण्यात आले आहे.निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी, महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन गुरूवार, दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे.  चित्रकला स्पर्धेचे आयोजन शालेय, महाविद्यालयामध्ये गुरूवार, दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायं ४ वाजता शासकीय मैदान, विजयपूर रोड, सोलापूर येथे करण्यात आले आहे.शनिवार, दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी द्वारकाधीश मंदीर, जुळे सोलापूर येथे   भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  सांस्कृतिक, नृत्य, गायन व फॅशन शो स्पर्धांचे आयोजन रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४  वाजता मांगल्य मंगल कार्यालय, भारतीय विद्यापीठ शेजारी, विजयपूर रोड, सोलापूर येथे करण्यात आले आहे.  याचवेळी रोप सांस्कृतिक महोत्सव:२०२४   कार्यक्रम व स्पर्धेतील सहभागी व विजेते यांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

या महोत्सवाच्या उत्कृष्ठ नियोजन व आयोजनासाठी आयोजन समिती स्थापित केली आहे. या समितीमध्ये  मुसा अत्तार, प्रा. अश्विनकुमार नागणे, मिलींद मोरे, संपन्न दिवाकर, अजित पात्रे, मोहित निकम, ऋषिकेश शिंदे, सचिन खंडागळे, आकाश मस्के, वैभव कुलकर्णी, आनंद साखरे, युन्नुस  अत्तार, इरफान शेख, रियाज गाडीवान, युसूफ अत्तार, रामण्णा बन्नी हे परिश्रम घेत आहेत.

या रोप महोत्सव: २०२४ नियोजित स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम दि. २१ सप्टेंबर २०२४ ही आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी  युसूफ पिरजादे (९८९०८६९८१४),   जया वाघमारे (९५६१०३७५६८),  मुसा अत्तार (८८३०३०७०२५),  अश्विनकुमार नागणे (९६०४६५६६६७) यांच्याशी संपर्क साधावा.तरी रोप सांस्कृतिक महोत्सव:२०२४ मध्ये सोलापूर मधील विद्यार्थी- विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact