प्रा. गणेश चन्ना यांना पर्यावरणसह विविध
महत्त्वाच्या विषयांवर भूमिका, मते मांडण्याची संधी
अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क||
सोलापूर : न्यूयॉर्क येथे आयोजित संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेसाठी सोलापूरचे प्रा. गणेश चन्ना यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रा. गणेश चन्ना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संयुक्त राष्ट्राचे शिखर परिषद दि. २० आणि २१ सप्टेंबर २०२४ रोजी होणार हे. भविष्यातील कृती (फ्युचर समिट) शिखर परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक वास्तुकला, मानवाधिकार, विकास आणि पर्यावरणीय प्रशासन यासह सात विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या दोन दिवसांच्या शिखर परिषदेसाठी जागतिक पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूरचे प्रा. गणेश चन्ना यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा. गणेश चन्ना यांना महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका आणि मते मांडण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ही परिषद दि. २० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणार आहे. या परिषदेसाठी जगभरातील अनेक महत्वाच्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय सामाजिक, नागरी संस्था, शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक समुदाय, पर्यावरणावर काम करणारे खाजगी क्षेत्र आणि परोपकारी संस्था यांचा समावेश आहे. या परिषदेसाठी अनेक सदस्य राष्ट्र, नागरी प्रतिनिधींना एकत्र आणेल समाज, खाजगी क्षेत्र, शैक्षणिक, स्थानिक आणि प्रादेशिक अधिकारी, सर्जनशील समुदाय, तरुण आणि बरेच अधिक प्रत्येकजण कृती दिवसांमध्ये उपस्थित, समाविष्ट आणि व्यस्त असेल. या भागधारकांकडे आहेत भविष्यासाठी कराराला आकार देण्यात सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी ती महत्त्वपूर्ण असेल. त्यांचे च्या शिखर परिषदेच्या यशासाठी सहभाग, योगदान आणि उत्प्रेरक एकत्रीकरण आवश्यक असेल असे अॅटोनियो गुटेरेस संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यांनी व्यक्त केले आहे.
जागतिक पर्यावरण परिषदेने जगभरात दशलक्षाहून अधिक झाडे आणि पर्यावरण संरक्षण जागतिक स्तरावर अनेक कॉन्फरन्स आणि वेबीनार आयोजित केले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, पश्चिम बंगाल, मणिपूर, आसाम आणि नेपाळ, भूतान, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अशा अनेक राज्यांमध्ये काँगो, इंडोनेशिया, थायलंड, फ्रान्स, झांबिया आदी देशांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यासाठी जागतिक पर्यावरण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश चन्ना यांनी आपल्या उत्कृष्ट नियोजनाने सोलापूर (महाराष्ट्र) जगभर प्रसिद्ध केले आहे.
ते सध्या अनेक नामवंत शैक्षणिक, सामाजिक, केंद्र सरकार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सदस्य, अध्यक्ष, संचालक म्हणून कार्यरत आहेत. जागतिक पर्यावरण परिषद गेली अनेक वर्षे पर्यावरण जागृतीसह अनेक वेबिनार, परिषदा आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करत आहे
त्यांच्या या योगदानासाठी त्यांचे कुटुंबियांची साथ लाभली असून, त्यांच्या पत्नी श्रीदेवी चन्ना, त्यांची मुले आदित्य, चैतन्य, अक्षरा यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच त्यांचे निकटवर्तीय मित्रमंडळी डॉ. अजयकुमार लोळगे, श्रीकांत गोटे, मयूर खंडाळ, श्रीकांत मेरगू, नागराज वन्नाल, संतोष म्हंता, अशोक किटद, अशोक कोनापुरे, अनमोल शर्मा, कारचुंग भुतिया, सुरज गायकवाड यांचेही नेहमीच सहकार्य लाभत आहे.