शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची उपस्थिती
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा भव्य मेळावा गुरुवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विजयपूर रोडवरील निर्मिती लाएन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत , सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ हे उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेतला जात आहे. या मेळाव्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या मेळाव्यासाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी महिला आघाडीच्या संजनाताई घाडी, उपनेते शरद कोळी, उपनेते अस्मिताताई गायकवाड, सह संपर्कप्रमुख उत्तमप्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, अजय दासरी, संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, दीपक गायकवाड, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, दक्षिण सोलापूर संपर्क प्रमुख अरविंद अडविलकर, उप जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, शहर मध्य शहर प्रमुख दत्तोपंत वानकर, उत्तर शहर प्रमुख महेश धाराशिवकर, युवासेना विठ्ठल वानकर, शहर संघटक अतुल भंवर उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस उपनेते शरद कोळी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, सहसंपर्कप्रमुख उत्तमप्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, अजय दासरी उपस्थित होते.
============================================================================
संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
जुळे सोलापुरातील ट्रायंगल टॉवर, लोकप्रिया हॉटेलसमोर, येथे अमर पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते केले जाणार आहे.
संयोजन समिती
शिवसैनिकांचा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये विधानसभा प्रमुख भीमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, धर्मराज बगले, रविकांत कांबळे, शरणराज केंगनाळकर, योगीराज पाटील, राजू बिराजदार, बालाजी चौगुले, राहुल गंदुरे, प्रियाताई बसवंती, मीनलताई दास, पूजाताई खंदारे, लताताई राठोड, अजय खांडेकर, सुनील कटारे, विक्रांत काकडे, आनंद बुक्कानवरे, संजय पोळ, आनंद थोरात, अजय स्वामी या शिवसैनिकांचा समावेश आहे.