image source

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम :  दि. १८ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबरपर्यंत प्रशिक्षण 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतकरी व सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्यावतीने सधन कुक्कुट विकास गट नेहरू नगर, सोलापूर येथे १५ दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षण आयोजित केले आहे. दि. १८ सप्टेंबर २०२४ ते दि. २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रशिक्षण कालावधी आहे. तरी प्रवेश घेऊ इच्छीत असणाऱ्यांनी दि. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज स्विकारले जातील. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान सातवी पास असणे अपेक्षित आहे.  सदर प्रशिक्षण  सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे. सदर प्रशिक्षणास सर्व प्रवर्गासाठी प्रवेश फी  १०० रूपये आकारण्यात येईल. सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, फोटो जोडणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षणासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एम. बोधनकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन.एल. नरळे यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *