image source
संततधार अन रिपरिप पाऊस; सोलापूरकर वैतागले !
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात संततधार अन रिपरिप पावसाचा जणूकाही धडाकाच सुरु झाला आहे. पाऊस काही थांबता थांबेना अन लोकांची कामे होता होईनात, अशी स्थिती सध्या सोलापूरकरांची झाली आहे. गेल्या दोन दिवसात सांगोला तालुक्यात सर्वाधिक १९८ मिमी पावसाची नोंद दरम्यान, रविवार आणि सोमवारी सोलापुरात सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही.
उत्तर सोलापूर तालुक्यात रविवारी दुपारपर्यंत १७८.४ मिलीमिटरच्या सरासरीने पाऊस झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात १८२.५ मिलीमीटर, बार्शी तालुक्यात १७२.६ मिलीमीटर, अक्कलकोट तालुक्यात १७३.९ मिमी, मोहोळ १७४.९ मिमी, माढा १७३.९ मिमी, करमाळा १७२.९ मिमी, पंढरपूर १८८.२ मिमी, सांगोला १९८ मिमी, माळशिरस १५८.२ मिमी, मंगळवेढा १८१.६ मिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस सांगोला तालुक्यात १९८ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
शाळकरी, विद्यार्थी, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनधारक, रिक्षा चालक, दुचाकी आणि चारचाकी वाहनवालेदेखील वैतागले आहेत. पावसामुळे विद्यार्थाचे हाल होत असून, शाळा-महाविद्यालयाला देखील त्यांना पावसाच्या धारा सोसत पावसात भिजत जावे लागत होते. अनेकांनी पावसात भिजतच आपली दैनदिनी सुरु ठेवल्याचे दिसत होते. मघा नक्षत्रानंतर पुर्वानेदेखील दमदार हजेरी लावली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. शेतातील कामे ठप्प झाली आहेत. गट रविवारी पहाटेपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली असून, रविवार आणि सोमवारीदेखील पावसाचा जोर कायम राहिले आहे.