कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २३ ऑक्टोबर-
सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, समर्थ स्पोर्ट्स नर्सरी व मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पार्क मैदानावर संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख उमाबाई श्राविका विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे आणि द.का.आसावा प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रमोद कुनगूलवार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यावेळी क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे शहर सचिव प्रा.संतोष खेंडे , खजिनदार प्रा. प्रमोद चु़ंगे, डॉ. उज्वल मलजी, अजित पाटील, मारुती घोडके, तलवारबाजी एनआयएस कोच अक्षय माने, शिवानंद सुतार व समर्थ स्पोर्ट्स नर्सरीचे खेळाडूच्या उपस्थितीत बुके देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
