साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या
योजनांसाठी अर्जाच्या प्रती सादर करण्याचे आवाहन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग,मातंग,मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. अर्जदारांनी सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी या योजनांमध्ये कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत, अशा अर्जदारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांची छायाकिंत तीन प्रतीत स्वयं साक्षांकित करुन दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास जमा करव्यात असे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.
सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ दिल्ली (एनएसएफडीसी, दिल्ली) व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना रक्कम ५ लाख रुपये, महिला समृध्दी योजना रक्कम १.४० लाख रुपये, या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. सदर योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने दि. २२ मार्च २०२४ रोजीपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली होती. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची व त्यासोबत जमा केलेल्या कागदपत्रांची छायाकिंत तीन प्रतीत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास जमा करणे आवकश्यक असल्याचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी कळविले आहे.