अक्कलकोट संस्थानचे राजे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरमधील पहिलं “ऑटो डॉग फिडर” च उदघाटन अक्कलकोट संस्थानचे राजे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोलापुरातील काही तरुणांनी एकत्रित येऊन मुक्या प्राण्यांसाठी आणि तेही मोकाट आणि भटक्या श्वानांसाठी स्वखर्चाने ऑटो डॉग फिडरची उभारणी केली. या माध्यमातून त्यांना खाद्यान्न पुरविणे हे खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. यामुळे होणाऱ्या जनजागृतीबद्दल श्रीमंत मालोजीराजेंनी कौतुक केले.
या कार्यक्रमास ब्रम्हदेव राऊत, दिनेश क्षीरसागर, अन्वर मकानदार, संजय जाधव, धनराज शिंदे, अॅड. राज सुरवसे, विकास कांबळे, सोलापूर स्ट्रीट पॉज (Solapur street Paws) या संस्थेचे यशवंत राऊत, सोहम पावले, चेतन पाटील, प्रवीण राऊत, सुशील चेंडके उपस्थित होते.
याप्रसंगी लोकांना ऑटो डॉग फिडरचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याची माहिती देऊन ते समोर दाखवण्यात आले. ऑटो डॉग फिडरमुळे कोणत्या प्रकारचा नुकसान आणि कोणत्या प्रकारचा धोका जनतेला नाहीं पण त्याचे फायदे जनतेला व जनतेच्या सुरक्षेसाठी आहेत.
या ऑटो डॉग फिडरमुळे रस्त्यावरील भटकंती करणाऱ्या कुत्र्यांना पौष्टिक,रस्त्यावरील व कचऱ्यामधील अन्न खाऊन त्यांच्या जीवाला होणारा धोका टळेल. एक वर्षाच्या आत संपूर्ण सोलापूरमध्ये ऑटो डॉग फिडर लावण्याची योजना असल्याचे सोहम पावले आणि यशवंत राऊत यांनी सांगितले. सर्व नागरिकांना या प्रकल्पात सहभागी होऊन समाजात एक नवा बदल घडविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.
सोलापूरमधील या उपक्रमामुळे रस्त्यावरील भटकंती श्वानांसाठी आवश्यक अन्नाची सोय होणार आहे, कोणताही प्राणी कधीच स्वतःहून नुकसान व त्रास देत नाही. श्वान हा मानवाचा सगळ्यात जवळचा मित्र मानला जातो. त्यामुळे ही जागरुकता निर्माण करून सामाजिक परिवर्तन घडवण्यास मदत होईल. आपल्या घरातील पाळीव श्वान मित्रांना सोबत आणून, सोलापूरला चार पायांच्या मित्रांसाठी एक सुरक्षित स्थान बनवण्यासाठी सहाय्य करा. या अन्न बँकेविषयी अधिक माहितीसाठी यशवंत राऊत (९९२३५७३२९) सोहम पावले (९९२३३०६६२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.