अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार यांच्या हस्ते उद्घाटन
by kanya news||
सोलापूर : सेंट्रल रेलवे मजदूर संघ, सोलापूरच्यावतीने “स्वतंत्रता दिनाचे” औचित्य साधून सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आयोजित रक्तदान शिबिरात १७० जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ. आनंद कांबले, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी ए.के.भगत, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी रेलवे कर्मचा-यांना प्रोत्साहन दिले.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता किशोर पिल्ले, श्रावण चिट्याळकर, ताजोद्दीन शिलेदार, सुहास सगरे, व्ही.एम. पाटील, नेताजी घोडके, अल्ली मुल्ला, विजय चोरगे, सुभाष पांढरे विद्याचल पांडे, विशेष निर्वाणी, प्रशांत शिंगाडे, प्रदीप दुपारगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.