कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २१ ऑक्टोबर-
जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात प्रसन्न पांडेकर प्रथम, सुजल लामकाने द्वितीय तर मुलींच्या गटात स्वरांजली नरळे प्रथम, वृंदा रव्वा द्वितीय आली आहे. सोलापूर शहर व जिल्हा सॉफ्टटेनिस असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका येथील लॉन टेनिस कोर्टवर झाल्या. यातुन सोलापूरचा मुला मुलींचा संघ निवडण्यात आला असून तो संघ वाशीम येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सहभाग नोंदविला जाणार आहे.अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी सत्येन जाधव होते. यावेळी उत्तर सोलापूरचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी नागेश धोत्रे, सॉफ्ट टेनिस सचिव प्रा. संतोष गवळी, आदर्श शिक्षक रोहित जाधव उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधीर सालगुडे, पूजा सालगुडे, श्रीकांत माने, उमेश बंडगेर, इम्रान शेख यांनी काम पाहिले.यशस्वी खेळाडूंचे सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, लॉन टेनिस राज्यमानद सचिव राजीव देसाई , जिल्हा सॉफ्ट टेनिस सचिव प्रा. संतोष गवळी, शिवाजी वसपटे, प्रा. संतोष खेंडे, सुधीर सालगुडे , महेश झांबरे, यांनी अभिनंदन केले आहे.
निवड झालेला संघ…. प्रसन्ना पांडेकर( v. C. E. M, व्हीसीईम स्कूल ), सुजल लामकाने ( इंडियन मॉडेल स्कूल), श्लोक यादव ( इंडियन मॉडेल ल स्कूल ), प्रणव मोहिते ( इंडियन मॉडेल स्कूल ), आर्यन धावडे ( सेंट जोसेफ हायस्कूल), ध्रुवेश पांढरे ( मॉडेल पब्लिक स्कूल), निखिल तांडुरे ( एस.व्ही .सी .एस. हायस्कूल ), सार्थक धुमाळ, राखीव निखिल जाधव ( शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल ).
मुलींचा संघ- स्वरांजली नरळे ( इंडियन मॉडेल स्कूल), वृंदा रव्वा ( बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल), रुची पवार ( ज्ञान प्रबोधनी स्कूल), स्वाती दोडमणी, अवनी यनगंदुली, समृद्धी चव्हाण (वि. वो. मेहता प्रशाला).