संभाजी ब्रिगेडचे वाशी येथे राज्यस्तरीय अधिवेशन
by kanya news||
सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे जिल्ह्यातील वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यरंग मंदिरामध्ये दी. २२ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम होत असून, कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे, अभिनेते सयाजी शिंदे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संभाजी ब्रिगेडने गेल्या दहा वर्षांमध्ये अर्थकारण चळवळीला प्राधान्य दिले आहे. आर्थिक साक्षरता घडवणे तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे ही यामागचा हेतू आहे. दि. २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध लेखक प्रफुल वानखेडे यांची मुलाखत अभिजीत कारंडे घेणार आहेत.
- ज्येष्ठ व्याख्याते निरंजन टकले हे “गांधींच्या स्वप्नातील भारत” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार हे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर बोलणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार ज्ञानेश महाराज यांचे सुद्धा विचार या निमित्ताने ऐकावयास मिळणार आहेत.
- कृषी उत्पन्नवर आधारित उद्योग उभा करून अर्थकारणाला नव्या चेहरा देणाऱ्या काही उद्योगपतींच्या सत्कार यावेळी होणार आहे . यामध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, नाशिक येथील सह्याद्री ऍग्रोचे विलास शिंदे, ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र पवार यांच्या सत्कार केला जाणार आहे.
समारोपाच्या सत्रामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूरचे खासदार शाहू राजे छत्रपती यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. या संमेलनामध्ये ३५ जिल्ह्यातील प्रतिनिधींशी संवाद साधणे, आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणे, नव्या ध्येय धोरणांची जुळणी करणे, संघटना बळकटीकरण आणि नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी असे विविध सत्र या संमेलनात आयोजित केले आहेत.
यावेळी प्रदेश संघटक दीपक दादा वाडदेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महानगराध्यक्ष शिरीष जगदाळे आदी उपस्थित होते.