परमपुज्य महातपस्वी श्री कुमारस्वामीजी यांचा ११५ वा जयंती महोत्सव सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रम
By Kanya News||
सोलापूर : परमपूज्य महातपस्वी श्री कुमारस्वामीजी यांच्या ११५ व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या जयंती महोत्सव निमित्ताने श्री राजेंद्र मायनाळ लिखित “महातपस्वी श्री कुमारस्वामीजी जीवन व कार्य” या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन समारंभ गुरुवार, दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी म.नि.प्र.बसवलिंगेश्वर महास्वामीजी मठाधिपती विरक्तमठ, अक्कलकोट यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी दिली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी उद्योजक एन. आय.जामगुंडी असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सामाजिक कार्यकर्ते व एम,के. फौंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे उपस्थित राहणार आहेत.
परमपूज्य महातपस्वी श्री कुमारस्वामीजी यांच्या ११५ व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने बुधवार दि.७ ऑगस्टपासून रोज सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मान्यवरांचे ज्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडत आहेत. सदरचे कार्यक्रम हे मंगळवार, दि. १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीपर्यंत चालणार आहेत. गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी परमपूज्य महातपस्वी श्री कुमारस्वामीजी यांचा जयंती महोत्सव सोहळा पार पडणार आहे. यावेळी ग्रंथ प्रकाशन, जयंती महोत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन आदी विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत सामुहिक प्रार्थना, सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ग्रंथ प्रकाशन, मान्यवरांचे विचार, दुपारी १२.३० ते १ यावेळेत सुहासिनी पूजन आदी कार्यक्रम होतील.
- रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. सुनीत यजुर्वेदी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी श्री दानेश्वरी वीरशैव लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्षा राजेश्वरी भादुले हे असतील. मोहोळ येथील शिवशंभो ब्लड बँक यांच्यावतीने रक्त संकलन करण्यात येणार आहे.
- व्याख्यानमाला व सास्कृतिक कार्यक्रमांतर्गत सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५.३० वाजता आपली राशी आणि उपासना या विषयावर ज्योतिषभास्कर दत्तगुरू माधव कुलकर्णी हे पाचवे पुष्प गुंफणार आहेत. मंगळवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५.३० वाजता संगीत रजनी हा कार्यक्रम होणार आहे. नागनाथ नागेशी (संगीत अलंकार) व सहकारी हे सादरीकरण करतील.सदरचे सर्व कार्यक्रम विजयपूर रोडवरील इंदिरानगर, पोस्ट ऑफिसजवळील परमपूज्य महातपस्वी श्री कुमारस्वामीजी योगविहार येथे होणार आहेत.
या पत्रकार परिषदेस आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे उपाध्यक्ष नीलकंठप्पा कोनापुरे, कार्यवाह बाबासाहेब कुलकर्णी विश्वस्त मंडळ अप्पाराव खट्टे, मल्लिकार्जुन मल्लाडे, विश्वनाथ म्हेत्रे, नागनाथ चौगुले, रमेश चौगुले, प्रतिभा मंगरुळकर आदी उपस्थित होते.