डॉ. नभा काकडे यांची कार्यवाहपदी निवड
By Kanya News||
सोलापूर : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांची सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या सहकार्यवाह डॉ. नभा काकडे यांची याच वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. यानिमित त्यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूरचे हिराचंद नेमचंद वाचनालय हे सर्वात मोठे “ अ” दर्जा असलेले आणि शंभर वर्षाची परंपरा असलेले जिल्हा ग्रंथालय आहे.