भीमा नदीकाठच्या गावातील लोकांनी खबरदारी इशारा
By Kanya News||
सोलापूर : उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी दि. ४ ऑगस्ट रोजी २० हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला असून, दि.६ ऑगस्ट रोजी हा विसर्ग विसर्ग ८१६०० क्यूसेक्स इतका झालेला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर, (ता.माढा) यांनी दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता उपयुक्त पाणीसाठी ८६ टक्के इतका झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील पुणे जिल्ह्यामधील पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागामार्फत रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी २० हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तर हा विसर्ग दि. ६ ऑगस्ट रोजीपर्यंत ८१६०० क्यूसेक्स इतका झालेला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.