v
गुणवंत पाल्यांचा गौरव, कवी संमेलन, सांगितीक कार्यक्रम “मर्म बंधातली ठेव”, रक्तदान शिबीर
By Kanya News||
सोलापूर : सोलापूरातील सामाजिक, शैक्षणिक, सहकारी व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने एक वेगळा ठसा रमटविणारे सहकार महषी कै. वि. गु. शिवदारे यांचा दि. ८ ऑगस्ट २0२४ रोजी ९६ वा स्मृती दिन आहे. येत्या १७ ऑगस्ट २0२४ रोजी त्यांची २८ वी जयंती आहे. या दोन्ही प्रसंगाचे औचित्य साधून त्यांनी स्थापन केलेल्या सोलापूर सिध्देश्वर सहकारी सहकारी बॅक, श्री स्वामी समर्थ सहकारी सूत मिल, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भांडार आणि सिद्ध-संग प्रतिष्टान यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना आदराजंली वाहण्यासाठी गुरूवार, दि. ८ ऑगस्ट ते शनिवार, दि. १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोह सोहळयाचे आयोजन केले आहे. या स्मृती समारोहामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ कार्यक्रम
सदर स्मृती समारोहातील पहिल्या दिवशी गुरूवार, दि. ८ ऑगष्ट २0२४ रोजी सायंकाळी६ वाजता लोकमान्य टिळक सभागृह (अस्थी थिएटर, हिराचंद नेमचंद वाचनालय) पार्क चीक, सोलापूर येथे सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सभासदांचे जे पाल्य मार्च/एपिल२0२४ मध्ये दहावी आणि बारावीमधील गुणवत्ताप्राप्त गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर स्मृती समारोह सोहळयाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम राजशेखर शिवदारे अध्यक्षतेखाली होणार आहे. गुणवंत पाल्यांना कुलगुरू प्रकाश महानवर हे मार्गदर्शन करणार आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
वैज्ञानिक प्रात्यक्षिके कार्यक्रम
शुक्रवार, दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता व्ही. जी शिवदारे कनिष्ठ महाविद्यालय व युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज ऑफ फॉर्मसी सभागृह, शिवदारे शैक्षणिक संकुल, विजयपूर रोड, जुळे सोलापूर येथे वैज्ञानिक प्रात्यक्षिके कार्यक्रम आयोजित केला आहे. याचे उद्घाटन भाभा अनुसंशोधन केंद्र, मुंबईचे ज्येष्ठ शास्त्र शास्त्रज्ञ जयंत जोशी, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंवईचे क्रांती दिन व्याख्याते संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा. ऋतुराज बुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थीनीसाठी जयंत जोशी यांनी वैज्ञानिक, प्रात्यक्षिके व माहिती देणार आहेत.
जुळ सोलापूर येथे कवी संमेलनाचे आयोजन
शनिवार, दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी घाऊक व किरकोळ ग्राहक भांडार (सुपर बझार), सिद्ध-संग प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज ऑफ फार्मसी सभागृह, शिवदारे संकुल, विजयपूर रोड, जुळ सोलापूर येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कवी माधव पवार, विद्या देशपांडे, रामचंद्र धर्मसाले, वंदना कुलकर्णी, क्षमा वळसंगकर, मारुती कटकधोंड, माधुरी भोसले, गिरीश दुनाखे, राजेंद्र भोसले, प्रांजली मोहिकर आदी कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सांगितीक कार्यक्रम “मर्म बंधातली ठेव”
सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक, कै. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान, सिद्धेश्वर बँक सेवक सांकृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे दि. १० ऑगस्ट रोजी सांयकाळी ६.३० वाजता सांगितीक कार्यक्रम “मर्म बंधातली ठेव” हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये झी लिटील चाम्पस मुग्धा वैशपायन, प्रथमेश लघाटे हे नाट्य गीत, भावगीत, अभंग, शास्त्रीय आणि लोकगीतांचा विविध भावस्पर्शी गाण्यांचा कार्यक्रम सदर करण्यात येणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
आंतरशालेय चित्रकला स्पर्धा
रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४५ वाजता युनिक इंग्लिश यांच्यावतीने विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सोलापूर शहर पातळीवर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुचन प्रशालेचे कला शिक्षक ईरय्या तडका यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे उपस्थित राहणार आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
जिल्हास्तरीय रोप-स्किपींग स्पर्धेचे आयोजन
रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता व्ही. जी. शिवदारे आर्ट्स, कॉमर्स व सायन्स, विजयपूर रोड येथे व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, जिल्हा रोपस्किपींग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रोप-स्किपींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ मिलिंद थोबडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव, रोप स्किपींगचे अध्यक्ष शिवशरण कोरे, सचिव प्रमोद चुंगे आदी उपस्थित राहणार आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मोफत दंत तपासणी शिबीर
सोमवार,दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल, फार्मसी कॉलेज कॉलेज कॅम्पस जुळे सोलापूर, रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन पंडीत दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय, केगाव येथे होणार आहे. यावेळी डॉ. निहार बुरटे, रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष डॉ. जान्हवी माखिजा, सचिव स्वप्नील कोंडगुळे उपस्थित राहणार आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबीर
मंगळवार, दि. १३ ऑगस्ट २0२४ रोजी सकाळी ८ वाजता कॉलेज ऑफ फार्मसी येथे रोटरी क्लब ऑफ नॉर्थ, कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आरोग्य जनजागरण उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मानद सचिव जयेश पटेल यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील माहेश्वरी, सचिव ब्रिजमोहन गोयधानी उपस्थित राहणार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
रक्तदान शिबिराचे आयोजन
बुधवार, दि . १४ ऑगस्ट २0२४ रोजी सकाळी १0 ते १ यावेळेत व्ही. जी. शिवदारे कॉमर्स व सायन्स कॉलेज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल आहे. या शिबिराचे उद्घाटन सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते होणार आहे . यावेळी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनेश बिराजदार आदी उपस्थित राहणार आहेत. निहार वुरटे मानसोपचार तज्ञ, रोटे, जान्हवी माखिजा अध्यक्ष, रोटरी क्लव ऑफ सोलापूर नॉर्थ, व रोट, स्वपनील कोंडगुळे सचिव रोटरी क्लव ऑफ सोलापूर नॉर्थ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४५ वाजता व्ही. जी. शिवदारे कॉमर्स व सायन्स येथे स्वातंत्र्य दिनादिमित्त द्वाजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
-
विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके
- शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिवदारे शैक्षणिक संकुल, जुळे सोलापूर येथे कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारंभ सोहळ्यांतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या हस्ते व विजयपूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा सोमनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीत पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोहाचा सांगता समारंभ शनिवार, दि. १७ ऑगस्ट २0२४ रोजी सायंकाळी५ वाजता किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय, पार्क चौक, सोलापूर येथे होणार आहे. तरी शहर रहिवाश्यांनी या सर्व सामाजिक उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोह समितीच्यावतीने करण्यात येते आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोह समिती
कै. वि. गु. शिवदारे स्मृती समारोह समितीत चेअरमन राजशेखर शिवदारे, व्हाईस चेअरमन राजशेखर हिप्परगे, नरेंद्र गंभिरे, व्हाईस चेअरमन सुचेता थोवडे, बी. व्ही. शेटे, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुस्तारे, शिवदारे कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. एस. सुत्रावे, व्ही.जी. शिवदारे कॉलचे प्राचार्य श्रुती गायकवाड, युनिक इंग्लिश मिडीअम स्कूलचे प्राचार्य पूजा वाजपई यांचा समावेश आहे.