मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली सोलापूर विभागातील टिकेकरवाडी,दुधनी स्टेशनची पाहणी
रेल्वे स्टेशनची स्वच्छता, प्रवासी सुरक्षा,पे अँड युज शौचालयासंदर्भात केल्या सूचना
By Kanya News ।।
सोलापूर: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सोलापूर विभागातील सोलापूर-टिकेकरवाडी-दुधनी स्टेशनची व्यापक पाहणी केली. महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी दि. २७ जुलै २०२४ रोजी सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकांची व्यापक पाहणी करून संबंधितांना सूचना केल्या.
प्रथमतः त्यांनी टिकेकरवाडी रेल्वे स्थानकावर प्रस्तावित होत असलेल्या कोचिंग मेगा टर्मिनल जागेची पाहणी केली. त्याविषयी संबंधित इंजिनिअरिंग विभागाकडून सखोल कामाची माहिती घेतली.
दुधनी रेल्वे स्थानकावर अमृत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट, स्टेशनची स्वच्छता, प्रवासी सुरक्षा, एफओबी आणि पुर्ण परिक्षेत्राची पाहणी केली. त्याविषयी अधिक माहिती मुख्य प्रकल्प व्यवस्थापका (CPM) कडून जाणून घेतली.
यावेळी, सोलापूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, अप्पर रेल्वे विभागीय व्यवस्थापक अंशुमाली कुमार, गती शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (CPM) शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ विभागीय अभियंता( समन्वय ) सचिन गणेर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे. एन. गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण) जगदीश, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता( टीआरडी ) अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता (जनरल) अभिषेक चौधरी, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी पी. रामचंद्रन, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता रामलाल प्यासे या प्रमुख अधिकाऱ्यांच्यासमावेत अन्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
प्रवासी सेवांवर अधिक भर देण्याच्या सूचना :
सोलापूर रेल्वे स्थानकावर, पे एन्ड युज शौचालयाची पाहणी केली आणि रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेची पाहणी केली. त्यांनी एकंदरीत आपल्या निरीक्षण दौऱ्यात स्टेशन डेव्हलपमेंट, प्रवासी सुविधा आणि सेवेचा दर्जा यांवर विशेष भर दिला असून, अमृत स्टेशन योजनेअंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट, स्टेशनची स्वच्छता, एफओबी आणि स्टेशन सर्कुलेटिंग क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या इतर प्रवासी सेवांवर अधिक भर देण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या .