सोलापूर शहर मध्यमधून विधानसभेसाठी मुस्लिम उमेदवार म्हणून संधी द्या; मुस्ताक शेख यांची मागणी

By Kanya News ।।
सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघामध्ये एक मुस्लिम समाजाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती शिवसेना अल्पसंख्यांक विभाग सोलापूर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यामंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना अल्पसंख्यांक विभाग सोलापूर लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख म्हणाले, सोलापूर शहर मध्य मतदार संघामध्ये दीड लाखांहून अधिक मुस्लिम समाज आहे. शहर मध्य असलेल्या तीन विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी ५० हजारांप्रमाणे मुस्लिम बांधवांचे मतदान आहे. मुल्सिम समाज परंपरेने काँग्रेस पक्षाला मतदान करीत आलेला आहे. परंतु, काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाची मते ही प्रामुख्याने एमआयएमआयएम पक्षाकडे झुकत चाललेली आहेत. ही बाब मुस्लिम समाज आणि महाराष्ट्राच्या हिटाची नसल्याकारणाने आपल्या माध्यमातून एक मुस्लिम उमेदवार दिल्यास संपूर्ण शहर आणि जिल्ह्यातील मुल्सिम समाजाला न्याय मिळेल.

यापूर्वी जरी आपण कोणत्याही प्रकारची निवडणूक लढविली नसली तरी, गेल्या ३०-३५ वर्षांपासून आपण एक कार्यकर्ता म्हणून समाजात काम केले असून, त्याच जोरावर आज आपण सोलापूर शहर मध्यमधून विधानसभेसाठी मुस्लिम उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवित आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact