अभय योजनेच्या दुस-या टप्प्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
By Kanya News||
सोलापूर : राज्यात मुद्रांक शुल्क चुकविणा-यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सदरील योजनेचा लाभ सोलापूर जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पी. जी. खोमणे यांनी केले आहे.
ही मुदतवाढ देताना आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ (म्हाडा), शहर आणि औदयोगित विकास महामंडळ (सिडको), महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ (एमआडीसी); तसेच महानगरपालिका, नगरपंचायतीच्या जागांवर विकसित झालेल्या इमारतींमधील रहिवाशांनाही योजना लागू करण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या जमिनीवर वसलेल्या नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेने निवासी किंवा अनिवासी युनिट्स बाबतचे पहिले वाटप पत्र किंवा शेअर सर्टिफिकेट किंवा स्टॅम्प नसलेल्या कागदावर किंवा लेटर हेडवर जारीकेलेले किंवा अंमलात आणलेले करार. (म्हाडा) आणि तिची विभागीय मंडळे किंवा शहर आणि औदयोगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको) किंवा महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) किंवा महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत किंवा विकास किंवा नियोजन प्राधिकरणांनी मंजुर केलेले किंवा स्थापन केलेले यांना लागू राहील.