सोलापूर शहर/जिल्ह्यातील पावसाची नोंद : मंगळवेढा, मारापूर,संगेवाडी, दारफळमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
By Kanya News||
सोलापूर : गेल्या काही दिवसापासून राज्यासह सोलापूर जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मारापूर, संगेवाडी, दारफळ या भागामध्ये आतापर्यत दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत सर्वाधिक नोंद झाली आहे. मंगळवेढा सहारसह मारापूर येथे अडीचशेहून अधिक टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवेढा शहरात १ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत नऊ दिवसात पडलेल्या पावसासह आतापर्यंत २०२.८ मिली पावसासह २७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तालुक्यातील मारापूर येथे १ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत चार दिवसातील पावसासह १८२.१ मिलीसह २५०.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे १ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत नऊ दिवसांत पडलेल्या पावसासह २६३.४ मिली पावसासह २१२.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
- उत्तर सोलापूर तालुक्यात दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान सात दिवसातील पावसासह ७८.५ मिली पावसासह ६३.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे . उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे १ जुलै ते २१ जुलै २०२४ पर्यंत पाच दिवसातील पावसाच्या नोंदीसह १२४.३ मिली पावसासह १००.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तिऱ्हे येथे दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान पाव दिवसाच्या पावसासह ५३.३ मिलीसह ४२.९ टक्के सावाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. एकूणताहा सोलापूर जिल्ह्यात नऊ दिवसात ९४ मिलीसह ९९.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर शहरात सहा दिवसांत ६९.९ मिलीसह ५६.४ टक्के पावसाची नोंद आहे.
- दक्षिण सोलापूर तालुक्यात दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान आठ दिवसाच्या पावसासह ८४.६ मिली पावसासह ७३.२ टक्के पावसाची नोंद आहे. तालुक्यातील निंबर्गी आणि मंद्रूप या गावी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. निंबर्गी येथे नऊ दिवसातील पावसासह १३९.५ मिली पावसासह १२०.७ टक्के पावसाची नोंद आहे. मंद्रूप येथे दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान आठ दिवसाच्या पावसाश ८१.३ मिली पावसासह ७०.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.सोलापूर शहरात १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान सहा दिवस पडलेल्या पावसाच्या नोंदीसह ६९.९ मिली पावसासह ५६.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.बार्शी तालुक्यात दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान दहा दिवसांच्या पावसाच्या कालावधीमध्ये १७२.२ मिली पावसासह १३९.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बार्शी शहरात आठ दिवसातील पावसासह १७८.६ मिली पावसासह १४४.४ टक्के पाऊस पडला आहे. आगळगाव येथे नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये २६३.४ मिली पावसासह २१२ टक्के पाऊस झाला आहे. खांडवी येथे सर्वात कमी पाऊस झाला आहे. आठ दिवसांच्या कालावधीतील पावसादरम्यान १०४.० मिली पावसासह ८४.१ टक्के पाऊस झाला आहे.
- अक्कलकोट तालुक्यात दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान नऊ दिवसातील पावसादरम्यान ९४.७ मिली पावसाश ७२.३ टक्के पाऊस झाला आहे.तालुक्यातील तडवळ येथे दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान दहा दिवसांत १३५.८ मिली पावसाश १०३.८ टक्के पाऊस झाला आहे. जेऊर येथे सावर्धिक कमी पाऊस झाला असून, सात दिवसाच्या कालावधीत ६१.६ मिली पावसासह ४७.१ टक्के पावसाची नोंद आहे.
- मोहोळ तालुक्यात दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान आठ दिवसांच्या कालावधीत ८७.९ मिमि पावसासह १०५.५ टक्के पाऊस झाला आहे.सावलेश्वरला आठ दिवसांच्या पाऊस कालावधीमध्ये ११३.९ मिली पावसासह १३७.७ टक्के पाऊस झाला आहे.वाघोली येथे केवळ चार दिवसांच्या कालावधीत ५७.७ मिली पावसाच्या नोंदीसह ६९.३ टक्के पाऊस झाला आहे.
- माढा तालुक्यात आठ दिवसामध्ये १०९.५ मिली पावसासह १२०.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील दारफळ येथे नऊ दिवसामध्ये १९७.८ मिलीसह २१८.३ टक्के पाऊस झाला आहे.रोपळेत चार दिवसांमध्ये ६२.२ मिलीसह ६८.७ टक्के पाऊस झाला आहे.
- करमाळा तालुक्यात सात दिवसांत ६६.४ मिलीसह ७५.३ टक्के पाऊस झाला आहे. करमाळा शहरात आठ दिवसात १०९५. मिलीसह १२०९ टक्के पावसाची नोंद आहे. कोर्टी येथे सर्वाधिक कमी ३७.७ मिलीसह ४२.७ टक्के पाऊस आहे.
- पंढरपूर तालुक्यात सात दिवसातील पावसादरम्यान १००.१ मिलीसह ११६.५ टक्के पाऊस झाला आहे. भाळवणी येथे पाच दिवसांत १४३.२ मिलीसः १६६. ७ टक्के पावसाची नोंद आहे. तुंगत येथे आठ दिवसात १४५.७ मिलीसह १४५.७ टक्के पाऊस झाला आहे. पुळूजला सहा दिवसांत सर्वाधिक ५७ मिलीसह ६६.४ टक्के पाऊस झाला आहे.
- सांगोला तालुक्यात चार दिवसांत ६३.५ मिलीसह ८७.२ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील संगेवाडीला पाच दिवसांत १५८.१ मिलीसः २१७.२ टक्के पाऊस झाला आहे. कोळा येथे सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. दि. १ जुलै ते २१ जुलै २०२४ दरम्यान केवळ दोनच दिवस पडलेल्या पावसासह २२.३ मिलीसः ३०.६ टक्के पाऊस झाला आहे.
- माळशिरस तालुक्यात पाच दिवसांत ३७.४ मिलीसः ४७.२ टक्के पाऊस झाला आहे. म्हाळुंगला सहा दिवसात ७५.३ मिलीसह ९५ टक्के पाऊस झाला आहे. दहीगावला पाच दिवसात सर्वाधिक कमी २६.६ मिलीसः ३३.५ टक्के पावसाची नोंद आहे.
- मंगळवेढा तालुक्यात सात दिवसात १३३.३ मिलीसः १८३.४ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक नऊ दिवसात मंगळवेढा शहरात २०२.८ मिलीसह २७९ टक्के पाऊस झाला आहे. पाच दिवसात सर्वाधिक कमी आंधळगावला १०७.९ मिलीसह १४८.४ टक्के पाऊस झाला आहे.