सोलापूर शहर, परिसरात संततधार पावसाची रिपरिप
By Kanya News||
सोलापूर : सोलापूर शहर व परीसरात शनिवारी (दि.२० जुलै) रोजी सकाळपासूनच संततधार पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होता. पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने हजेरी लाऊन सर्वाना दिलासा दिला आहे. खास करून शेतकरी वर्गाना. मृग नक्षत्राच्या पावसानंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने शनिवारी शहरात सकाळपासून हजेरी लावली. जरी दिवसभर पाऊस सुरु असला तरी पावसाचा जोर मात्र कमी होता. केवळ संततधार सुरु असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झाला असून, संपूर्ण राज्यभर पावसाचा जोर असल्याचा हवामान खात्याचा वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार आहे.