प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

By Kanya News|

सोलापूर :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विदयार्थी/विदयार्थीना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम ३ ते ५ विदयार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी हस्तलिखित अर्ज.,सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची गूणपत्रिका ,शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशन कार्ड, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सादर करावीत असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर यांनी कळविले आहे.

 तरी इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विदयार्थ्यानी/विदयार्थीनी दि. २६जुलै २०२४ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावे. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *